जळगाव : जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्याची मोहीम राबविण्यात आली़ सोमवार सायंकाळपर्यंत तब्बल ६ लाख ६३ हजार ३६० हेक्टरवरील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.अवकाळी ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला़ त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडून हवालदिल झाला आहे.शेतीला लागलेला खर्चही निघालेला नाही़ दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याच्या सूचना केल्यानंतर प्रशासनाने हालचाली करीत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतींचे पंचनामे करण्यास सुरूवात केली होती़अंदाजापेक्षा अधिक नुकसानीचे पंचनामेदरम्यान, प्रशासनाकडून ६ लाख १ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला होता़ त्यानुसार त्वरित पंचनाम्याच्या कार्यवाहीस सुरूवात झाली़ दरम्यान, सोमवार, ११ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत प्रशासनाकडून तब्बल ६ लाख ६३ हजार ३६० हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याचा अहवाल हाती आला़ म्हणजेचं, अंदाजे हेक्टरपैकी प्रत्यक्षात केलेल्या पंचनाम्यामध्ये ६२ हजार हेक्टर अधिक निघाले़ यात सुध्दा वाढ होण्याची शक्यता आहे़ दोन ते तीन दिवस पंचनामे होण्याची शक्यता आहे़ त्यानंतर संपूर्ण तालुक्यांचा अहवाल हा शासनाला पाठविण्यात येणार आहे़५० हजार हेक्टर जागेवर पंचनाम्याची गरज नाहीअतिवृृष्टी व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान तर झालेचं़, शिवाय काही हेक्टरवरील पिके आधीच काढण्यात आली तर काही ठिकाणी नुकसान झाले नाही़ त्यामुळे ५० हजार २०४ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्याची आवश्यकता नसल्याचाही अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाला आहे़६ लाख ६ हजार ४४४ शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामेजिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सुमारे सोमवारपर्यंत ६ लाख ६ हजार ४४४ शेतकºयांच्या ६ लाख ६३ हजार ३६० हेक्टरवरील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत़ अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली़ दरम्यान, लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे़
जळगाव जिल्ह्यात ६ लाख ६३ हजार हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:26 AM