जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात १० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून हतनूर धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडले आहेत.२९ जुलै पासून गायब झालेल्या पावसाचे तब्बल १८ दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात जोरदार पुनरागमन झाले. दरम्यानच्या काळात जळगाव शहरासह काही तालुक्यांमध्ये पावसाने तुरळक हजेरी लावली होती. मात्र आता जोरदार पाऊस आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे नदी व नाले वाहू लागल्याने धरणसाठा वाढण्यास मदत होत आहे.तीन मोठ्या प्रकल्पांवर भिस्तजळगाव जिल्ह्याची भिस्त गिरणा, हतनूर व वाघूर या तीन मोठ्या धरणांवर अवलंबून असते.पाणीसाठा पुरेसा झाला नाही तर भीषण टंचाईला सामोरे जावे लागते.वाघूर, हतनूरमध्ये आवक सुरूगुरूवारी झालेल्या दमदार पावसाने वाघूर व हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. हतनूर धरणात पाणी येणे सुरू झाल्याने पाणीपातळी वाढत आहे. शुक्रवारी धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आले.जोरदार पावसामुळे खरीप हंगामाला जीवदानगेल्या तीन आठवड्यांपाासून गायब झालेल्या वरुण राजाचे जोरदार पुनरागमण झाल्याने खरीप हंगामाला नवसंजिवणी मिळाली आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना गुरुवारी झालेल्या पावसामुळे जीवदान मिळाले असून, शेंगामध्ये दाणा तयार होण्याचा प्रक्रियेदरम्यानच वरुणराजाचे आगमण झाल्यामुळे या पिकांना फायदा होणार आहे. यासह कोरडवाहू कापसाच्या पिकाला देखील लाभ होणार आहे. २७ जुलैपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यातील ५ हजार हेक्टरवरील खरीप हंगाम धोक्यात आला होता.दरम्यान, जळगाव तालुक्यातील दापोरा परिसरात केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात १० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:18 PM
केळी पिकाचे नुकसान
ठळक मुद्देवाघूर, हतनूरमध्ये आवक सुरूजोरदार पावसामुळे खरीप हंगामाला जीवदान