शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

भारनियमनाच्या असह्य चटक्यांनी जळगावकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 11:11 PM

परीक्षा, सणासुदीच्या काळातील संकटाने संताप

ठळक मुद्दे सर्व नऊ ग्रुपच्या फिडरवर भारनियमनदोन तासापासून ते साडेनऊ तास भारनियमन

ऑनलाईन लोकमत 

जळगाव, दि. 6 - पावसाचे कमी प्रमाण, वीज निर्मितीचे काही संच बंद पडल्याने वीज निर्मितीमध्ये घट येऊन भारनियमनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातीलही सर्वच नऊ ग्रुपच्या फिडरवर  भारनियमन केले जात असून ऐन ‘ऑक्टोबर हिट’च्या तडाख्यात दोन तास ते साडे नऊ तासाच्या भारनियमनामुळे शहरवासीय होरपळून निघत आहे. विजेच्या पुरवठय़ापेक्षा मागणी वाढल्याने राज्यभर  भारनियमन करण्यात येत आह़े त्यानुसार शहरातही भारनियमन वाढले आहे.  अनेक संच बंद पडल्याने वीज निर्मितीवर मोठा परिणाम होऊन  भारनियमन कक्षाकडून  परिमंडळ कार्यालयांना कुठे व किती तास भारनियमन करावे, याबाबत आदेश देण्यात आले आहे.  

सर्व फिडरवर भारनियमनयापूर्वी शहरात ज्या ठिकाणी वीजचोरी जास्त आहे व वसुली कमी आहे, अशाच ठिकाणी आपत्कालीन भारनियमन केले जात असे. यामध्ये शहरातील फिडरचे नऊ ग्रुप तयार करण्यात आले आहे. यामध्ये ग्रुप ई, एफ, जी-1, जी-2 या ग्रुपवर हे भारनियमन होत असे. मात्र आता या ग्रुपसह कधीतरी भारनियमन होणा:या ए ते डी ग्रुपमधील फिडरवरदेखील भारनियमन केले जात आहे. 

नागरिक घामाघूमसध्या ऑक्टोबर हिटचा चांगलाच तडाखा जाणवत असून या उकाडय़ामुळे नागरिक हैराण आहेत. त्यात भरात भर म्हणजे भारनियमनामुळे घरात बसणे कठीण झाले आहे. यामध्ये लहान बालकांनाही जास्त त्रास होत आहे. दुपारी, संध्याकाळी होणा:या भारनियमनामुळे नागरिक घामाघू होत आहेत. 

परीक्षेच्या काळातील भारनियमनाने विद्याथ्र्यानाही फटकासध्या परीक्षेचा काळ असल्याने अनेक शाळांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत तर काहींच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. ऐन परीक्षेच्या काळातील भारनियमनामुळे अभ्यासावर परिणाम होत असल्याने विद्यार्थी व पालकही चिंतीत झाले आहेत. 

सणासुदीत अंधाराने संतापऐन सणासुदीचा काळ जवळ येत असल्याने व भारनियमन वाढत असल्याने नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. सध्या सुरू असलेले भारनियमन ऐन प्रकाशपर्व, दिवाळीच्या दिवसातही सुरू राहण्याच्या शक्यतेने शहरवासीय चिंतीत झाले आहेत. 

रुग्णांना असह्य वेदनासध्या शहरात डेंग्यू व इतर आजाराचे रुग्ण असल्याने त्यांनाही याचा फटका बसत आहे. वाढता उकाडा व त्यात भारनियमनामुळे डेंग्यूचे रुग्ण तळमळत आहे. शहरातील रुग्णालयामध्येही हीच स्थिती असून जनरेटरवर जास्त भार शक्य होत नसल्याचे चित्र आहे. 

संपूर्ण शहरात भारनियमन यापूर्वी ई फिडरवरील शास्त्री टॉवर, भवानीपेठ, नवीपेठ, फुले मार्केट,  एफ फिडरवरील  संत मीराबाई नगर,  ज़ेडी़सी़सी बँक कॉलनी परिसर, जिल्हापेठ परिसर, सिंधी कॉलनी, सालार नगर, कासमवाडी,  बळीरामपेठ, रथचौक, सुभाष चौक, जिल्हा परिषद, शनिपेठ या भागात  भारनियमन  केले जात होते. मात्र आता सर्वच्या सर्व नऊ ग्रुपमधील फिडरवर भारनियमन केले जात आहे. 

नागरिकांनी दिले निवेदनवाढत्या भारनियमनाच्या पाश्र्वभूमीवर तसेच नागरिकांना होणा:या त्रासासंदर्भात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला महानगराध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, अशफाक पिंजारी, डॉ. सुषमा चौधरी, डॉ. शरीफ बागवान, फहीम पटेल, रऊ फ शेख, सैयद आबिद अली, वैशाली झाल्टे आदींनी महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय तडवी यांना निवेदन दिले व भारनियमन बंद करण्याची मागणी केली. 

औद्योगिक वसाहतीलाही झळऔद्योगिक वसाहत परिसरातही दररोज अचानक एक ते दीड तास वीज गायब होत आहे. येथे भारनियमन नसले तरी काहीही न कळविता वीज गेल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. डाळ उद्योगाचा विचार केला तर प्रक्रियेसाठी माल मशिनमध्ये टाकलेला असताना अचानक वीज गेल्यास तो अडकून राहतो व पुन्हा काढण्यास मोठा वेळ जातो. सोबतच कामगार, मजूर बसून राहत आहे.  एकूणच डाळ उत्पादनावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

असे आहे भारनियमन- ग्रुप ए -  तीन तास 15 मिनिटे- ग्रुप बी - चार तास- ग्रुप सी - चार तास 45 मिनिटे- ग्रुप डी - पाच तास 30 मिनिटे- ग्रुप ई - सहा तास 15 मिनिटे- ग्रुप एफ - सात तास- ग्रुप ई 1 - सात तास 45 मिनिटे- ग्रुप जी 1 - आठ तास 30 मिनिटे- ग्रुप जी 2 - नऊ तास 15 मिनिटे

हे सर्व भारनियमन दररोज सकाळी सहा ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत वेगवेगळ्य़ा वेळेनुसार दोन टप्प्यात केले जात आहे. 

वरिष्ठ पातळीवरील आदेशानुसार भारनियमन केले जात आहे. सध्या शहरातील नऊ ग्रुपवरील फिडरवर दोन तास ते साडेनऊ तास भारनियमन केले जात आहे.- संजय तडवी, कार्यकारी अभियंता, महावितरण.

अचानक एक ते दीड तास वीज जात असल्याने कामगार, मजूर बसून राहतात व काम ठप्प होऊन उत्पादनावर परिणाम होत आहे. - प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.