जळगाव : कोरोनामुळे एस. टी. महामंडळाची प्रवासी सेवा बंद असल्यामुळे, पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून महामंडळाने आता मालवाहतुकीलाही सुरुवात केली आहे. या मालवाहतूकीतून महामंडळाच्या जळगाव विभागाने राज्यभरातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दीड महिन्यात या विभागाने २३ लाखांची कमाई केली आहे.जळगाव विभागाने २८ मे पासून मालवाहतूकीला सुरुवात केली आहे. या साठी ४० बसेसचे मालवाहू ट्रकमध्ये रूपांतर करण्यात आले असून, मालाची ने-आण व नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व ११ डेपोमध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दुसरा क्रमांक अहमदनगर व तिसरा सोलापूर विभागाने पटकाविला आहे.विविध उद्योगांचा कच्चा माल, धान्य, औषधे, भाजीपाला, केळी व इतर वस्तूंची वाहतूक यात अंतर्गत करण्यात आली.आगार निहाय उत्पन्नजळगाव - ३ लाख ७४ हजार ४०६रावेर - ५ लाख ७५ हजार ४९७जामनेर २ लाख ५६ हजार ९७५चाळीसगाव - २ लाख ४८ हजार ८६०पाचोरा - १ लाख ८४ हजार ८७०अमळनेर - १ लाख ४६ हजार ३९चोपडा - १ लाख ४५ हजार ३४०भुसावळ -१ लाख ३१ हजार ९३५एरंडोल -१ लाख २१ हजार ३९३यावल -९१ हजार ७४०मुक्ताईनगर - ४२ हजार ३४५एकुण- २३ लाख १९ हजार ४००मालवाहतुकीचा धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे एस.टीला पुन्हा उर्जित अवस्था प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. यामध्ये कर्मचारी व इतर अधिकाऱ्यांमुळे जळगाव विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. - राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, जळगाव
मालवाहतुकीत जळगाव विभाग राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 11:59 AM