जळगाव: ४ जानेवारी रोजी जळगाव ते डोंबिवली बस क्र.एम. एच. १४ बी. टी. ३२७२ या बसला सकाळी ८ च्या सुमारास पारोळा जवळील मोंढाळा गावाजवळ अचानक आग लागली.ही आग बॅटरी बॉक्स जवळ लागून बस मध्ये प्रचंड धूर पसरल्याने प्रवाशांचा थरकाप उडाला. याप्रसंगी एसटी बसचे चालक बाळू हटकर (जळगांव आगार) यांनी तात्काळ बस थांबवून प्रवाशांना धीर दिला बस मधून उडी घेऊन रस्त्याच्या कडेची माती भरून आणत आग विझवायला सुरुवात केली यादरम्यान एसटी वाहक दीपक कोळी यांनी प्रवाशांना दिलासा देत संकटकालीन दरवाज्यातून बाहेर पडण्याचा सूचना दिल्या.सदर वाहन हे इगतपुरी आगाराचे असून रिलीफ म्हणून देण्यात आले होते, या बस मध्ये पुरेशी साधने नसल्याने चालक वाहकाची चांगलीच दमछाक झाली. बसमध्ये कुणालाही इजा झाली नाही व जास्तीचे नुकसान टळले.या बसमधील प्रवाशांनी प्रसंगावधानता दाखविल्याबद्दल चालक व वाहकांचे आभार मानले. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे आर के पाटील व गोपाळ पाटील यांनी चालक वाहकांचे अभिनंदन केले.
जळगांव-डोंबिवली बस पेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 12:47 PM
चालकामुळे वाचले प्रवाशाचे प्राण
ठळक मुद्दे तात्काळ बस थांबवून प्रवाशांना धीर दिला