Jalgaon Election : सुरेश दादांची सत्ता संपुष्टात, सेनेचे स्वप्न भंगले, जळगावात भाजपचे कमळचं जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 05:56 PM2018-08-03T17:56:04+5:302018-08-03T18:03:59+5:30

मनपा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला चारीमुंड्याचित करीत सर्वाधिक ५७ जागा पटकावित सत्तांतर घडवून आणले. भाजपाच्या या विजयामुळे पहिल्यांदाच जळगाव मनपावर कमळ बहरले आहे.

Jalgaon Election : Suresh Dada's rule ends, the BJP's dream is broken, the BJP has won in Jalgaon | Jalgaon Election : सुरेश दादांची सत्ता संपुष्टात, सेनेचे स्वप्न भंगले, जळगावात भाजपचे कमळचं जिंकले

Jalgaon Election : सुरेश दादांची सत्ता संपुष्टात, सेनेचे स्वप्न भंगले, जळगावात भाजपचे कमळचं जिंकले

Next

जळगाव - मनपा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला चारीमुंड्याचित करीत सर्वाधिक ५७ जागा पटकावित सत्तांतर घडवून आणले. भाजपाच्या या विजयामुळे पहिल्यांदाच जळगाव मनपावर कमळ बहरले आहे. यंदा शिवसेनेला फक्त १५ जागांवर समाधान मानावे लागले. ‘एमआयएम’ने ३ जागा पटाकावत चमत्कार घडविला तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व समाजवादी पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. अपक्षांच्याही पदरी निराशा पडली. 

जळगाव महापालिकेतील धक्कादायक निकालाने सुरेशदादांची तत्कालीन नपा व नंतर मनपावर असलेली ३५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपले वर्चस्व या निवडणुकीत सिद्ध केले आहे. एमआयडीसीतील ई-८मधील गोडावूनमध्ये शुक्रवारी मनपाच्या ७५ जागांसाठी रिंगणात असलेल्या ३०३ उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी झाली. भाजपा व शिवसेनेमध्ये काट्याची लढत रंगण्याची अपेक्षा होती. मात्र, भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवित मनपावर ऐतिहासीक विजयाची नोंद केली आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन व जलसंपदा गिरीश महाजन यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. 

मनपात पहिल्यांदाच मिळाले एका पक्षाला बहुमत 

२००३ मध्ये महानगरपालिका स्थापन झाल्यापासून कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नव्हते. भाजपाने ७५ पैकी सर्वाधिक ५७ जागा जिंकत बहुमत मिळविले. २००३ मध्ये सुरेशदादा जैन हे राष्ट्रवादीत असताना राष्ट्रवादीला ३४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, एका जागेसाठी बहुमत मिळाले नव्हते. त्यानंतर २००८ मध्ये खाविआ सर्वात मोठा पक्ष होवून ३२ जागा मिळाल्या, बहुमतासाठी ३ जागा कमी पडल्या होत्या. तर २०१३ मध्येदेखील ३३ जागा मिळवत खाविआच मोठा पक्ष ठरला होता. मात्र, स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. पण, या निवडणुकीत भाजपाने विरोधकांना भुईसपाट करुन बहुमत प्राप्त केले आहे. 

आघाडीची प्रचंड दैना

मनपा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान ८ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला झटका दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व समाजवादी पक्षाने आघाडी करून ६२ जागांवर आपले उमेदवार उभे केले. मात्र, राष्ट्रवादीच्या प्रचारात कोणतीही धार दिसून आली नाही. राज्यपातळीवर एक-दोन नेते वगळता इतरांनी प्रचाराकडे पाठ फिरवली. तर काँग्रेस व समाजवादी पक्षाची स्थितीदेखील सारखीच होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला असून, २०१३ मध्ये ११ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत एकही जागेवर विजय मिळवता आला नाही.

Web Title: Jalgaon Election : Suresh Dada's rule ends, the BJP's dream is broken, the BJP has won in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.