फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : पिंपरुड, ता.यावल येथील एका गोदामावर स्थानिक पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून छापा टाकला असता तेथे हजारोचा गुटखा आढळून आला. यामुळे गुटखा माफियामध्ये खळबळ उडाली आहेदरम्यान, जळगाव येथे जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी गुटखा माफियाविरोधात कारवाई केल्यानंतर त्याच मालकांचा फैजपूर येथील गुटका असल्याने जळगाव येथील कारवाईचे फैजपूर कनेक्शन उघड झाले आहे असल्याची चर्चा आहे. या गुटख्याच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.दरम्यान, या फैजपुरातील या कारवाईचे जळगाव येथील लाखों रुपयांचा गुटखा कारवाईशी कनेक्शन असल्याचे माहिती अधिकाºयांनी दिली. या प्रकरणी सेवकराम दशरथ नारवानी (वय ३२, रा.सिंधी कॉलनी, जळगाव) गोदाम मालक संतोष प्रभाकर पाटील (वय ५८, रा.पिंपरुड) या दोघांना ताब्यात घेतले आहे. यातील मूळ मालकांवरसुध्दा कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितले.पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहायक फौजदार हेमंत सांगळे, पो.हे.का दिलीप तायडे, पोलीस नाईक किरण चाटे, योगेश महाजन, चेतन महाजन, अलताफ शेख या पथकाने पिंपरूड गावातील एका गोदमावर छापा टाकला. या तपासणीत हजारो रुपयांचा गुटखा आढळून आला याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन निरीक्षक अनिल गुजर, सहायक निरीक्षक चंद्रकांत सोनवणे यांनी रात्रीपर्यंत कारवाईचे काम सुरू होते.
जळगाव गुटखा माफियाचे फैजपूर कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 1:54 AM