जळगाव : घरकुल प्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. एस.पी.देशमुख व न्या. वि. भा. कंकणवाडी यांच्या द्वीपाठात दहा जणांच्या जामीनाचे कामकाज होणार आहे. सोमवारी कामकाज चालविण्याचे या द्वीपीठाने निश्चित करुन पुढील सुनावणी बुधवार १३ रोजी होणार आहे.माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा जामीन व शिक्षेबाबतच्या अपीलावर मुंबई उच्च न्यायालयात कामकाज होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यांचे प्रकरण मुंबईला स्थलांतर करण्यात आले आहे. आरोपींच्यावतीने अॅड.जयदीप चटर्जी, अॅड.विनायक होन, अॅड.किशोर संत, अॅड महेश देशमुख, अॅड.सत्यजित बोरा, अॅड.किशोर संत व अॅड. मुकुल कुळकर्णी कामकाज पाहत आहेत.
जळगाव घरकुल प्रकरणात जामीनावर उद्या कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:33 AM