शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

जळगावात माणुसकीचे दर्शन, मरणासन्न अवस्थेतील बेवारस तरुणास जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:14 PM

आठ दिवसांपासून पडलेल्यास गोलाणी मार्केटमधील व्यावस्यायिकांनी दिला आधार

ठळक मुद्देव्यावसायिकांच्या माणुसकिचे कौतुकमानसिक धक्का बसल्याचा अंदाज

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 30 - सहा महिन्यांपासून भटकत फिरणा:या व गेल्या आठ दिवसांपासून गोलाणी मार्केटमध्ये मरणासन्न अवस्थेतील बेवारस मतीमंद मुलाला येथील व्यावसायिकांनी पुढाकार घेत जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्याला जीवदान दिले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या महिला महानगरप्रमुख मंगला बारी यांच्यासह व्यावसायिकांनी पदरमोड करीत त्याला नवीन कपडे घेऊन देत त्याची स्वच्छ आंघोळ करून घेत त्याला मदत केली. साधारण 25 वर्षे वयोगटातील एक मतीमंद तरुण गेल्या सहा महिन्यांपासून शहर व परिसरात फिरत होता. गेल्या आठ दिवसांपासून हा तरुण गोलाणी मार्केटमध्ये पडलेला होता. तेथे तो काहीही खात नव्हता. केवळ पाणी पित होता. या दरम्यान आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीनेदेखील त्याची अत्यंत वाईट स्थिती झाली होती. पोटाला अन्न नसल्याने हा तरुण अत्यंत हाडकुळा झाला असून त्याच्या सर्व बरगडय़ा व हाडे दिसून येत आहे. एकाच ठिकाणी पडून होता. अगदी नैसर्गिकविधी देखील तेथेच करीत होता. त्यामुळे तो अत्यंत घाणीने माखला गेला व त्याची दरुगधीही सुटली होती. या बाबत मंगळवारी शिवसेनेच्या महिला महानगरप्रमुख मंगला बारी यांना माहिती मिळाल्याने त्यांनी  108 रुग्णवाहिकेशी संपर्क साधून बोलविले. तेथे रुग्णवाहिका आली मात्र तरुण घाणीने माखलेला असल्याने त्याला उचलणेही कठीण होते. त्यामुळे ते परत गेले. अखेर बुधवारी मंगला बारी यांनी तसेच इतर व्यावसायिकांनी मिळून खर्च करीत काही जणांना बोलावून या तरुणाची आंघोळ, दाढी करवून घेतली तसेच त्यास नवीन कपडे आणून दिले. त्याची स्वच्छता करण्यात आल्यानंतर त्यास 108 रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जिल्हा रुग्णालयातही तातडीची मदतजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर या तरुणावर वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय बिराजदार तसेच परिचारिका व कर्मचा:यांनी तातडीने उपचार केले. या तरुणाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले असून अशक्तपणादेखील असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या या तरुणावर जिल्हा रुग्णालयातच उपचार सुरू असून येथे त्याची देखभाल केली जात आहे. 

मानसिक धक्का बसल्याचा अंदाजकधी पासून इकडे तिकडे फिरणा:या या तरुणास मानसिक धक्का बसला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तो स्वत:चे नावदेखील सांगत नाही. केवळ भुसावळ असा उल्लेख तो करतो. त्यामुळे तो नेमका कुठला आहे, हे देखील समजू शकलेले नाही.

व्यावसायिकांच्या माणुसकिचे कौतुककोणतीही ओळख अथवा काहीही माहिती नसताना मंगला बारी यांनी पुढाकार घेत गोलाणी मार्केटमधील व्यावसायिकांच्या मदतीने एका बेवारस तरुणासाठी 700 ते 800 रुपयांचा खर्च करीत त्याच्या उपचारासाठी पुढाकार घेत माणुसकीचे दर्शन घडविले:या या मदतकार्याचे सर्वाकडून कौतुक केले जात आहे.