ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.28- इंद्रप्रस्थ नगरात चोरटय़ांनी हेमंत दत्तात्रय बडगुजर यांच्या घरातून दहा तोळे सोन्याचे दागिने व 25 हजाराची रोकड चोरुन नेल्याची घटना रविवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे चोरी झाली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य घरात झोपले होते. घरात गार हवा येण्यासाठी बडगुजर यांनी फक्त लोखंडी दरवाजालाच कुलुप लावले होते. चोरटय़ांनी हे कुलुप उघडून घरात प्रवेश केला.
न्यायालयात नोकरीला असलेले हेमंत बडगुजर हे इंद्रप्रस्थ नगरात नाभिक समाज मंगल कार्यालयासमोर वास्तव्याला आहेत. शनिवारी अमळनेर येथे नातेवाईकाकडे लगA असल्याने बडगुजर, त्यांची प}ी सुनंदा, मुलगा अतुल व मुलगी दीपाली असे सर्व जण तेथे गेले होते. रात्री दहा वाजता अमळनेर येथून आल्यानंतर प}ी सुनंदा यांनी दागिने व रोकड ठेवलेली पर्स त्यांनी झोपण्याच्या जागेच्या शेजारीच ठेवली. लगAाच्या ठिकाणी जेवण झाल्यामुळे घरी जेवण न करता सर्व जण साडे दहा वाजता झोपले होते.
बडगुजर सकाळी सहा वाजता उठले असता त्यांना लोखंडी दरवाजा उघडा दिसला तर किचनच्या दिशेने असलेल्या बाहेरील मोकळ्या जागेत पर्स ठेवलेली पिशवी आढळून आली. ही पिशवी बाहेर का ठेवली म्हणून त्यांनी प}ीला विचारणा केली असता मी तर अजून उठलेही नाही,त्यामुळे पिशवी मी ठेवलीच नाही व त्यात दागिने असलेली पर्स होती असे त्यांनी सांगितले, तेव्हा घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.