कुंदन पाटीलजळगाव : गत पाच वर्षांच्या भूजलपातळीची घेतलेल्या नोंदीच्या सरासरी तुलनेत यंदा मार्च महिन्यातच सर्वच तालुक्यात भूजल पातळीत घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात तापमान कमी असताना बेमोसमी पावसानेही हजेरी लावली होती, हे विशेष.
मार्चनंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील भूजल पातळी घसरायला सुरुवात होते. मात्र गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा जास्त पातळी घरसल्याचे दिसून येत आहे.गेल्यावर्षी झालेल्या चांगल्या पावसानंतरही भूजल पातळीत होणारी घट चिंतेची बाब असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.गेल्या पाच वर्षातील व यंदाची भूजल पातळीची तालुकानिहाय सरासरी नोंद (मीटरमध्ये)तालुका- मत पाचवर्षातील नोंद- मार्च-२०२३मुक्ताईनगर- १२.१३- ११.५९रावेर- १८.५६- १६.७८भुसावळ- १०.२९- ०८.७५बोदवड- ११.१०- ०९.९३यावल- २५.१०- २३.३६जामनेर- ०७.५४- ०६.३१धरणगाव- ०७.२१- ०५.९०एरंडोल- ०३.९७- ०३.४३चोपडा- १३.७१- ११.५९अमळनेर- ०८.३७- ०६.९७पारोळा- ०६.२१- ०५.२२पाचोरा- ०५.९१- ०५.३०भडगाव- ०५.८२- ०५.०९चाळीसगाव- ०६.९४- ०५.५२