शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

जळगाव :नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 5:33 PM

: वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावेत.

कुंदन पाटील 

जळगाव : वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावेत. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात शनिवारी त्यांना पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली.

नशीराबाद, बेळी, निमगांव, उमाळे, देव्हारी, चिंचोली परिसरात केळी, लिंबू, पपई आदि पिकांसोबतच झाडे उन्मळून पडली आहे. तसेच दोनशेवर घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. जिल्हाधिकारी अमन मित्तल,  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, तहसीलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे,  कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी राऊत, महावितरणचे आवटे, विस्तार अधिकारी पी. बी. अहिरे, स्थानिक लोकप्रतिनिधींसहग्रामसेवक, तलाठी, कृषि सहाय्यक यावेळी उपस्थित होते. 

बेळीला टॅंकरने पाणीपुरवठा

बेळी, निमगांव व नशिराबाद येथे वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोल व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा. तसेच विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत आवश्यकता भासल्यास गावकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी टॅकरने पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्याचे निर्देश दिले.  घरांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु झाले आहेत. घरकुलांच्या यादीतील नुकसानग्रस्त घरांना प्राधान्याने घरकुल मंजूर केले जाईल, असे जिल्हाधिकारी मित्तल यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ सुरु झाला आहे.बियाणे, खते व किटकनाशकांबाबत येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली आहे.    या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत संपर्क साधता येईल. त्यासाठी ८९८३८३९४६८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर व  ०२५७-२२३९०५४ कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे.

तक्रार निवारण कक्षात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे (८९८३८३९४६८), वरिष्ठ लिपीक संतोष भावसार (८९८३८३९४६८), कृषी सहाय्यक समाधान देवरे(८९८३८३९४६८) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.