जळगाव : समाजात बदनामी झाली, त्या दोघांना शिक्षा करा असा मजकूर असलेली चिठ्ठी लिहून कानळदा (ता.जळगाव) येथील माहेर असलेली मयुरी प्रशांत इंगळे (वय ३३, रा.राहूळ, ता.खामगाव) व तिचा प्रियकर गजानन विश्वनाथ पंडीतकार (वय ४०,रा.घाटपुरी,ता.खामगाव) या प्रेमीयुगुलाने कारमध्येच विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी एमआयडीसीतील रेमंड चौकात घडली.कानळदा येथील मयुरी दिलीपराव देशमुख (माहेरचे नाव) हिचे राहूळ, ता.खामगाव येथील प्रशांत इंगळे यांच्याशी विवाह झाला होता. दोघांना तन्मय (वय ११) व पूर्वा (वय ९) ही दोन मुले आहेत. पाच वर्षापूर्वी मयुरी यांचे पती प्रशांत यांचे निधन झाले. या दरम्यानच्या काळात मयुरी ही खामगाव येथे सराफाचे काम करणाऱ्या गजानन विश्वनाथ पंडीतकार यांच्या संपर्कात आली. दोघांमध्ये प्रेमप्रकरण बहरले होते. जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर रेमंड चौकात त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली.
जळगावात कारमध्ये विष प्राशन करुन प्रेमीयुगुलाने संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 10:04 PM
समाजात बदनामी झाली, त्या दोघांना शिक्षा करा असा मजकूर असलेली चिठ्ठी लिहून कानळदा (ता.जळगाव) येथील माहेर असलेली मयुरी प्रशांत इंगळे (वय ३३, रा.राहूळ, ता.खामगाव) व तिचा प्रियकर गजानन विश्वनाथ पंडीतकार (वय ४०,रा.घाटपुरी,ता.खामगाव) या प्रेमीयुगुलाने कारमध्येच विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी एमआयडीसीतील रेमंड चौकात घडली.
ठळक मुद्देजळगावातील रेमंड चौकातील घटनाप्रेयसी कानळदा येथील तर प्रियकर खामगावचाआत्महत्येनंतर आढळली सुसाईड नोट