कुंदन पाटील, जळगाव : मतदान यंत्र एवढ्या दिवसापासून ठेवून देखील त्यांची बॅटरी ९९ टक्के कशी आहे, अशी शंका उपस्थित करीत रावेर लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून थांबवली आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्रात रावेर मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया खोंळबली आहे.
रावेर मतदार संघात तिसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू असून भाजपच्या रक्षा खडसे यांचे मत्ताधिक्य वाढत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मतदान यंत्रावर शंका उपस्थित केली आहे. मतदान यंत्रे एवढ्या दिवसापासून ठेवून देखील त्यांची बॅटरी ९९ टक्के कशी आहे अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. ज्या मतदान यंत्राचे बॅटरी ९९ टक्के आहे, त्या मतदान यंत्रात भाजपला आघाडी मिळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. श्रीराम पाटील लवकरच मध्यमांशी बोलणार आहे.