शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

जळगावात विद्येच्या मंदिरात मद्यपींची भरतेय शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 3:08 PM

शिक्षक, कर्मचाºयांना रोज फेकाव्या लागतात दारुच्या बाटल्या

ठळक मुद्दे३०-४० मद्यपी युवकांचा असतो घोळकाशिक्षण विभागाकडे केली अनेकदा तक्रार...सुरक्षा रक्षकाच्या नियुक्तीची आवश्यकता

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.७ : शहरातील शिवतिर्थ मैदान परिसरातील जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन शाळेच्या आवारात रोज रात्री मद्यपींचा अड्डा भरत आहे. मद्यपींकडून शाळेच्या आवारातच दारुच्या बाटल्या फेकल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, शाळेतील शिक्षक व शिपायांना या दारुच्या बाटल्या रोज जमा करून फेकाव्या लागत आहेत. मात्र या प्रकाराकडे पोलीस प्रशासन व जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. यामुळे शिक्षक व पालकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन शाळेच्या परिसर अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी ३० ते ४० मद्यपींचा खास अड्डा बनला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून या ठिकाणी दारुच्या पार्ट्या रंगत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच रात्रीच्या पार्ट्या संपल्यानंतर रोज सकाळी शाळेच्या आवारात दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे शाळेत येणाºया विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. अनेकदा मुख्य प्रवेशव्दाराजवळच या बाटल्या पडलेल्या असतात. विद्यानिकेतन शाळेसह पंचायत समिती व गट शिक्षणाधिकाºयांचा कार्यालयाच्या आवारात देखील या बाटल्या पडलेल्या असतात.३०-४० युवकांचा असतो घोळकारात्री ९ वाजेनंतर या ठिकाणी मद्यपींचा अड्डा सुरु होतो. मद्यपींमध्ये युवकांची मोठ्या प्रमाणात संख्या असून दररोज या ठिकाणी ३० ते ४० मद्यपींचा घोळका या ठिकाणी दररोज असतो. दरम्यान, रात्रीच्या वेळी पोलीसांच्या गस्ती पथकाकडून शहरात पाहणी होते. मात्र या ठिकाणी दररोज सुरु असलेल्या अड्याकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे. बुधवारी शाळेतील शिक्षकांनी ‘लोकमत’ ला याबाबतची माहिती दिल्यानंतर, सकाळी १० वाजेच्या सुमारास शाळा सुरु होण्याअगोदर ‘लोकमत’च्या चमुने या ठिकाणी पाहणी केली असता, ठिक-ठिकाणी दारुच्या बाटल्या दिसल्या. शिवतिर्थ मैदानाला सुरक्षा भिंत तयार करण्यात आली असली, तरी जिल्हा ग्रामीण विकास केंद्राकडील दरवाजा उघडाच असतो.शिक्षण विभागाकडे केली अनेकदा तक्रार...गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरु असून याबाबत जि.प.विद्यानिकेतनच्या प्राचार्यांनी शिक्षण विभागाकडे याबाबत तक्रार देखील केली. त्यानंतर शिक्षण विभागाकडून या ठिकाणी रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. मात्र काही महिन्यातच सुरक्षा रक्षक ाचे देखील येणे बंद झाले. यामुळे मद्यपींना या ठिकाणी मोकळे रान मिळाले आहे. दरम्यान, बुधवारी देखील विद्यानिकेतन शाळेचे प्राचार्य व शिक्षकांनी शिक्षणाधिकाºयांकडे या प्रकाराबाबत तक्रार दिली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावSchoolशाळा