जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी रविवारी पक्षाच्या वर्धापन दिनी अंतर्गत नाराजीमुळे आगामी मनपा निवडणुकीत नेतृत्व करण्यास सपशेल नकार दिला. एवढेच नाही, तर गेल्या काळात काही खटकणाºया बाबींबाबतही तीव्र नाराजी व्यक्त केली. वर्धापन दिनी त्यांना ‘गोड’ करण्याचा झालेला प्रयत्नही असफल ठरला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हा कार्यालयात सकाळी १० वाजून १० मिनिटांनी ईश्वरलाल जैन यांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते ध्वज पूजन झाले. त्यानंतर पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली. त्यावेळी ईश्वरलाल जैन यांनी नाराजी व्यक्त केली.पक्ष तिसºया क्रमांकावर...जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी क्रमांक १ वर असलेला आपला पक्ष आता तिसºया क्रमांकावर गेला आहे. पक्षाला पुन्हा क्रमांक १ वर नेण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे तसेच ईश्वरलाल जैन यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केली.मागेही केली होती नाराजी व्यक्तईश्वरलाल जैन यांनी काही महिन्यापूर्वी जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील हे जळगावात आले असता त्यांच्याशी बंदद्वार चर्चा करुन काही खटकणाºया गोष्टी त्यांच्याजवळ व्यक्त केल्या होत्या. हीच नाराजी त्यांनी आता रविवारी झालेल्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे व्यक्त केली.वर्षभरापूर्वी पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार चोपडा येथे माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्याकडे आले असता त्यावेळी जळगावात काही मोजक्या पदाधिकाºयांसोबत बैठक झाली होती, त्यातही शरद पवार यांनी ईश्वरलाल जैन यांना मनपा निवडणुकीसाठी नेतृत्व करावे, अशी सूचना केली होती मात्र त्यावेळीही बाबुजी यांनी नम्रपणे नकार दिला होता.‘त्या’ व्यक्तीला कधीही आमदार होवू देणार नाहीजैन यांनी जामनेर तालुका नेतृत्वाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली. निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतले जात नाही. तालुकाध्यक्षही परस्पर केला. पूर्वी आपली त्यांनी ऐनवेळी साथही सोडली आहे. यामुळे त्यांनी आपल्याकडून पुढे कोणत्याही मदतीची अपेक्षा ठेवू नये. कोणत्याही स्थितीत ‘या’ व्यक्तीला आमदार होवू देणार नाही, मी मेलो तरी मनीषलाही सांगून ठेवेन की ‘या’ व्यक्तीस कधीही मदत करायची नाही, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.
जळगाव मनपा निवडणुकीच्या नेतृत्वास ईश्वरलाल जैन यांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 3:32 PM
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी रविवारी पक्षाच्या वर्धापन दिनी अंतर्गत नाराजीमुळे आगामी मनपा निवडणुकीत नेतृत्व करण्यास सपशेल नकार दिला. एवढेच नाही, तर गेल्या काळात काही खटकणाºया बाबींबाबतही तीव्र नाराजी व्यक्त केली. वर्धापन दिनी त्यांना ‘गोड’ करण्याचा झालेला प्रयत्नही असफल ठरला.
ठळक मुद्दे‘राष्ट्रवादी ’च्या वर्धापनदिनी नाराजी‘गोड’ करण्याचा प्रयत्न असफलपहिल्या क्रमांकावरचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर