जळगाव : आपल्या विविध मागण्यासांठी मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या संपाच्या पाचव्या दिवशीही वाहतूकदार संपावर ठाम आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या मालाच्या आवकमध्ये घट होऊन ती ५० टक्क्यांवर आली आहे. तर येथून राज्याच्या विविध भागांसह इतर राज्यात जाणारा मालही जात नसल्याचे चित्र आहे. या सोबतच १५०० वस्तूंची बाजारपेठ असलेल्या दाणाबाजारातही मालाची आवक ठप्प झाली आहे. दरम्यान, आपल्या मागण्यांसंदर्भात मंगळवारी जळगाव जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्यावतीने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले.डिझेलच्या वाढलेल्या किंमती, ई-वे बिल मधील जाचक अटी व इतर मागण्यासांठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्लीतर्फे २० जुलै पासून देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात जळगाव शहरातील ३०० माल वाहतूकदार व इतर तालुक्यांमधील २०० असे एकूण ५०० माल वाहतूकदार सहभागी झाले आहेत. मंगळवारीदेखील त्यावर तोडगा न निघाल्याने संप कायम आहे.जळगाव बाजार समितीमधून मका, हरभरा, दादर, डाळी यासह इतरही माल मोठ्या प्रमाणात पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, मुंबईसह इतरही शहरात तसेच दुसºया राज्यातही माल जातो. मात्र वाहतूकदारांच्या संपामुळे येथे वाहने लागत नसल्याने येथून मालाची खरेदी होत नसल्याने हे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत.
जळगाव बाजार समितीमध्ये धान्य, कडधान्य पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 8:45 PM
आपल्या विविध मागण्यासांठी मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या संपाच्या पाचव्या दिवशीही वाहतूकदार संपावर ठाम आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या मालाच्या आवकमध्ये घट होऊन ती ५० टक्क्यांवर आली आहे.
ठळक मुद्देवाहतूकदारांचा संपामुळे हालआवकही मंदावली, भाजीपाल्याची आवक सुरूदाणा बाजारातील मालाची आवक ठप्प