जळगाव - दहा दिवसांपूर्वी मनसेमधून शिवसेनेत गेलेले महापौर ललित कोल्हे यांनी आपल्या अन्य पाच नगरसेवकांसह रविवारी रात्री शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला. महापौरांना खेचण्यासाठी भाजपाकडून दिवसभर प्रयत्न सुरू होते.रात्री ८.३० वाजेच्या सुमारास कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांना भाजपाने त्यांच्याकडे खेचले.रविवारी महाजन यांनी कोल्हे यांच्यासह मनसेच्या सहा नगरसेवकांना भाजपात घेऊन शिवसेनेला धक्का दिला.नगरसेवक संतोष पाटील, पद्मा सोनवणे, खुशबु बनसोडे, ललित कोल्हे यांचे वडील नगरसेवक विजय कोल्हे तसेच आई सिंधू कोल्हे यांनी देखील भाजपात प्रवेश केला. राष्टÑवादी काँग्रेसच्या नगरसेविका कंचन सनकत यांनी देखील समर्थकांसह भाजपात प्रवेश केला.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. जळगाव शहरात सध्या भाजपाचेच वातावरण पहायला मिळत असून, जनतेचा कौल भाजपाकडेच राहणार आहे. शिवसेनेतील कोणत्याही नेत्याशी वाद नसून, केवळ महाजन यांच्या सूचनेवरुन भाजपात प्रवेश केला.- ललित कोल्हे, महापौर
जळगावचे महापौर शिवसेनेतून भाजपात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 5:49 AM