जळगाव,दि.26- एमआयडीसीला साकेगाव ऐवजी शेळगाव बॅरेजवरून पाणी देण्याचे प्रस्तावित असून याचा प्रस्ताव तयार करण्यापूर्वी बुधवारी उद्योजक, एमआयडीसीचे आधिकारी व जलसंपदाचे अधिकारी बॅरेजला भेट देतील, असा निर्णय मंगळवारी एमआयडीसीत जिल्हाधिका:यांनी दिलेल्या भेटी दरम्यान घेण्यात आला.
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मंगळवारी एमआयडीसीत जाऊन उद्योजकांशी संवाद साधला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत उद्योजकांची गेल्या आठवडय़ात बैठक झाली होती. औद्योगिक वसाहतीतील घन कचरा व्यवस्थापनासंदर्भात जैविक कच:यापासून नियोजित बायोगॅस निर्मिती प्रकल्पाबाबत मनपाशी करार करण्यासंदर्भात एमआयडीसीच्या अधिका:यांनी कार्यवाही करावी जेणे करून या प्रकल्पाची उपयुक्तता तपासता येईल तसेच येथील औद्योगिक क्षेत्रातील कच:यासाठीही मनपाशी करार करावा अशा सूचना दिली. यावेळी एमआयडीसीतील उद्योग, कचरा डेपो, रस्ते, जुन्या वसाहतीस त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता बी.बी. हरशे, उपअभियंता जे. पी. पवार, क्षेत्रीय व्यवस्थापक एम. डी. पटेल, जिंदाचे उपाध्यक्ष किरण राणे, सचिन चोरडिया, लक्ष्मीकांत चौधरी उपस्थित होते.