जळगाव : बंद पडलेल्या जळगाव -मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होण्यास अखेर मुहूर्त मिळाला असून हैदराबाद येथील ट्रू जेट या विमान कंपनीतर्फे येत्या १७ जुलैपासून ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. ट्रू जेटच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जळगावात शुक्रवारी सायंकाळी उद्योजकांसोबत घेतलेल्या बैठकीत ही घोषणा केली.एअर डेक्कन कंपनीतर्फे सुरु करण्यात आलेली जळगाव -मुंबई विमानसेवा वर्षभराच्या आतच बंद पडली. त्यानंतर उडाण योजनेच्या दुसºया व तिसºया टप्प्यात ‘ट्रू जेट’ या कंपनीने जळगाव ते मुंबई सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. या सेवेसंदर्भात ट्रू जेटच्या अधिकाºयांनी उद्योजकांची बैठक घेतली. या बैठकीला ट्रू जेटचे विक्री व्यवस्थापक निशित भट, नैमिश जोशी व नियोजन अधिकारी आशिष तलेवार, विमानतळ व्यवस्थापक सुनील मगरीवार यांच्यासह उद्योजक प्रेम कोगटा, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, पुरुषोत्तम टावरी, दिलीप गांधी, सुभाष सांखला, विनोद बियाणी, सचिन चोरडिया, उमेश सावंत, राजेश मलिक, किरण बेंडाळे, नरेंद्र झंवर आदी उपस्थित होते.१७ जुलैपासून सेवा सुरु करण्याची तयारीनैमिश जोशी यांनी सांगितले की, दुसºया टप्प्यात अहमदाबाद ते जळगाव व तिसºया टप्प्यात जळगाव ते मुंबई सेवा सुरु करण्यात येणार आहे. ट्रू जेट कंपनीच्या ‘पाईव्ह एटीआर’या ७२ आसनी विमानाच्या मार्फत ही सेवा चालविण्यात येणार असून अहमदाबाद ते जळगाव व जळगाव ते मुंबई अशी सेवा चालविण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रात औरगांबाद, नाशिक, कोल्हापूर येथे सेवा सुरु असून १७ जुलैपासून जळगावचीही सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवार वगळता दररोज जळगाव-मुंबईची सेवा सुरु राहणार असून सोमवारी फक्त अहमदाबाद जळगाव सेवा राहणार असल्याचे ते म्हणाले. निशित भट यांनी सांगितले की, शाळेकरी विद्यार्थ्यांसाठी एखाद्या पर्यटन ठिकाणी सहलीसाठी प्रवास भाड्यात सवलत देण्यात येणार आहे.दीड ते अडीच हजार रुपयांच्या दरम्यान जळगाव ते मुंबईचे तिकीट राहणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व खासदार उन्मेष पाटील यांच्याकडे येणाºया अडचणींबाबत चर्चा करण्यात येईल, असे भरत अमळकर यांनी सांगितले.अशी असेल ट्रू जेटची जळगाव-ते मुंबई सेवाट्रू जेट कंपनीतर्फे फक्त दर सोमवारी जळगाव ते मुंबई सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सोमवारी अहमदाबाद येथून सकाळी ९. ४५ वाजता विमान निघून ते सकाळी ११ वाजता जळगावला पोहचेल. तर जळगावहून प्रवासी घेऊन सकाळी ११.२० वाजता निघून दुपारी १२.३५ वाजता अहमदाबादला पोहचणार आहे. तर मंगळवार, बुधवार व गुरुवार अहमदाबाद येथून सकाळी ९.४५ निघून जळगावला ११ वाजता विमान येईल. येथून प्रवाशांना घेऊन ११.२० वाजता निघेल आणि मुंबई येथे साडेबारा वाजता पोहचेल. तसेच मुंबई येथून दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी निघून जळगावला दुपारी सव्वा दोन वाजता येईल. तर जळगावहुन २ वाजून ४० मिनिटांनी निघून दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी अहमदाबादला पोहचेल. तसेच शुक्रवार, शनिवार व रविवारी अहमदाबाद येथून सकाळी ९. ४५ विमान निघून सकाळी ११ वाजता जळगावला येईल. या ठिकाणाहून ११ .२० मिनिटांनी निघून, दुपारी साडेबारा वाजता मुंबई येथे पोहचेल. मुबंई येथून हे विमान जळगावी न येता, दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी कोल्हापूरच्या दिशेने निघून तेथे दुपारी सव्वा दोन वाजता पोहचेल. कोल्हापूरहून लगेच दुपारी २.४० मिनिटांनी निघून, दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी मुंबई येथे पोहचेल. तर मुंबईहुन दुपारी ४.२५ मिनिटांनी निघून जळगावला सायंकाळी ५. वाजून ३५ मिनिटांनी पोहचेल. त्यानंतर जळगावहून अहमदाबादच्या दिशेने सायंकाळी ६ वाजता निघून सायं. सव्वा सातवाजता अहमदाबाद येथे पोहचेल.
१७ जुलैपासून जळगाव-मुंबई विमानसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 1:00 PM