जळगाव : हुडकोकडून कर्जापोटी डिआरएटी कोर्टाने बुधवारी मनपाच्या तीन बॅँकाचे खाते सील केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या वृत्ताला आमदार सुरेश भोळे यांनी देखील दूजोरा दिला असून, या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आमदार भोळे यांनी ‘लोकमत’ ला दिली. बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता डिआरटी कोर्टाची नोटीस मनपाला प्राप्त झाली.हुडकोकडून घेतलेल्या कर्जासंदर्भात डीआरटी कोर्टाने मनपास ३४१ कोटी रुपये कर्ज भरण्यासंदर्भात हूकमनामा (डिक्री) २०११ मध्ये दिला होता. या निकालाविरोधात मनपाने डीआरएटी कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका जानेवारी २०१९ मध्ये मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे डीआरएटी कोर्टाने फेटाळून लावली होती.त्यामुळे हुडकोला मनपाची बॅँक खाते सील करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.काय आहे प्रकरण१. सन २००१ मध्ये हुडकोने हे कर्ज एनपीए घोषीत केले होते. त्यानतंर सन २००४ मध्ये कर्जाचे रिसेटलमेंट करण्यात आले. मात्र त्यानुसार देखील महापालिकेने फेड केली नाही. कर्जफेड होत नसल्याने हुडकोने याप्रकरणी डिआरटी कोर्टात सन २०११ मध्ये याचिकाही दाखल केली आहे. त्यावेळी हुडकोने पुन्हा ३४० कोटी रुपयांची मागणी केली होती.२. २०१२ मध्ये ठरल्यानुसार कर्जफेडीचा पहिला १२९ कोटीचा हप्ता मनपाने भरला नाही. त्यामुळे तारण असलेली सतरामजली इमारत व गोलाणी संकुलाच्या लिलावाची नोटीस डीआरटी कोर्टाने काढली होती. त्यानतंर ७ आॅगस्ट २०१४ रोजी मनपाची खाती डिआरटीच्या आदेशाने सील केली होती.डिआरएटीने कोर्टाकडून मनपाला बुधवारी नोटीस प्राप्त झाली आहे. या नोटीसबाबतीत मनपाच्या विधी सल्लागाराकडून माहिती घेतली जात आहे. याबाबतीत विधी तज्ज्ञांकडून काही सल्ला घेतल्यानंतरच माहिती दिली जाईल.-डॉ.उदय टेकाळे, आयुक्तडिआरएटी कोर्टाने मनपाचे खाते सील केल्याची माहिती मिळाली असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असून, या समस्येवर लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न राहणार आहे.-सुरेश भोळे, आमदारमनपाने डिक्री नोटीसविरोधात डिआरएटीने कोर्टात याचिका दाखल केली होती. प्रशासनाच्या गलथानपणामुळे ही याचिका फेटाळण्यात आली. -नितीन लढ्ढा, नगरसेवक, शिवसेना२०१४ मध्ये तत्कालीन भाजपा नेत्यांनी खाते सील करण्यासाठी प्रयत्न केले होते. आता केंद्र, राज्य व मनपात भाजपाची सत्ता असतानाही ही नामुष्की टाळू शकले नाही. -सुनील महाजन, विरोधी पक्ष नेते
जळगाव महापालिकेचे बॅँक खाते सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 1:17 PM