शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

जळगाव मनपात भाजपच्या ऐतिहासिक विजयाची वर्षपूर्ती : वर्षभरानंतरही आव्हाने कायम ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:11 PM

१०० कोटींचा निधी मंजूर ; काही प्रश्न ‘जैसे थे’

जळगाव : गेल्यावर्षी ३ आॅगस्ट रोजीच मनपा निवडणुकीच्या निकालात भाजपचे पहिल्यांदाच ५७ नगरसेवक विजयी झाले होते. भाजपाने मनपात मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाची आज वर्षपूर्ती होत आहे. अजूनही बरीच आव्हाने सत्ताधाऱ्यांसमोर कायम आहेत. ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने वर्षभरात शासनाकडून मनपाला १०० कोटी रुपयांचा मंजूर झाला असला तरी त्यातून कामांना मात्र सुरुवात झालेली नाही.वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या प्रचारात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वर्षभरात जळगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याचा दावा केला होता. शहराचा चेहरा-मोहरा जरी बदलला नसला तरी मनपाच्या घनकचरा प्रकल्पाच्या ३० कोटींच्या डीपीआरमधून ९ कोटींतून ८५ घंटागाड्या आणून शहरासाठी तब्बल ७५ कोटी रुपयांचा सफाईचा मक्ता देण्यात आला आहे. अजून मक्तेदाराकडून कामाला सुरुवात झालेली नाही. भविष्यात शहराच्या साफ सफाईच्या कामांमध्ये नक्कीच फरक झालेला दिसून येईल. तसेच मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षापुर्वी दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून कामांना सुरुवात झाली आहे. याच निधीतून साडे सात कोटी रुपयांचा एलईडीची योजना मात्र सपशेल फेल ठरली आहे. संबधित कंपनीने योग्य काम न केल्याने सत्ताधाऱ्यांवर हा मक्ता रद्द करण्याची नामुष्की ओढावलेली दिसून आली.खड्डयांचा प्रश्न बिकटशहरातील रस्त्यांची अक्षरश वाट लागली आहे. अमृत योजनेमुळे रस्ते पुर्णपणे खोदण्यात आले असून मनपाकडून केवळ थातुर-मातूर दुरुस्ती करण्यात आली.गेल्या महिन्यात शहरातील उद्योजक अनिल बोरोले यांना या खड्डयांमुळे झालेल्या अपघातात जीव गमवावा लागला होता. खड्डयांचा समस्येबाबत नागरिकांमध्ये सत्ताधारी व मनपा प्रशासनाबद्दल प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे.१०० कोटींचा निधी जाहीर कामांची मात्र प्रतीक्षागिरीश महाजन म्हणाले होते की, मनपात सत्ता आल्यानंतर शहरासाठी शासनाकडून २०० कोटींचा निधी आणू, त्यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे १६ आॅगस्ट २०१८ रोजी नगरोथ्थान अंतर्गत मनपासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. मात्र, आता हा निधी मंजूर होवून देखील वर्ष झाले. वर्षभरात या निधीतून एकाही कामाला सुरुवात झाली नाही. यातील ४२ कोटी रुपयांचा कामांना शासनाने अंतिम मंजुरी दिली असून, या कामांसाठी लवकरच निविदा काढून कामांना सुरुवात करण्याचा मानस महापौरांनी व्यक्त केला आहे. तसेच या निधीतून ५८ कोटी रुपयांच्या निधीतील कामांना अजून प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे.गाळे, हुडको प्रश्नांची गुंतागुंत कायमजळगावच्या विकासाला अडसर असलेले हुडको कर्जाचा व मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न अजूनही कायम आहे. विशेष म्हणजे ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने हे दोन्ही प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. मात्र, दोन्ही ही प्रश्न वर्षभरात अधिकच किचकट होवून गेले आहेत. गाळेधारकांसाठी अधिनियमात बदल करण्याचे आश्वासन सत्ताधारी भाजपाने दिले होते. मात्र, वर्षभरात अधिनियमात जरी बदल केला तरी या बदलाचा जळगावच्या गाळेधारकांसाठी कोणताही फायदा झालेला नसून, आता गाळेधारकांनी सत्ताधाºयांना हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तर हुडको प्रकरणी देखील जानेवारी २०१९ मध्ये डिआरएटी मध्ये मनपाची याचिका फेटाळल्यानंतर २६ जून मनपाचे बॅँक खाते सील करण्यात आले होते. मुंबई उच्चन्यायालयाच्या आदेशानंतर दोन बॅँकाचे खाते उघडण्यात आले असले तरी मात्र अ‍ॅक्सीस बॅॅँकेचे खाते महिनाभरापासूनच बंदच आहे.वर्षभरात नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्यात आले असून, सफाईचा मक्ता देण्यात आल्याने जळगाव शहर एक स्वच्छ शहर म्हणून घडविण्याचा मानस आहे. शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, त्यातून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे. पुढील वर्षभरात शहरात आणखीन बराच बदल झालेला पहायला मिळेल.-सीमा भोळे, महापौरनागरिकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा प्रयत्न आहे. वर्षभरात मोठा निधी शासनाकडून मनपासाठी आणण्यात यश मिळाले आहे. हुडको कर्जफेडीचा प्रश्न लवकरच सुटणार असून, गाळ्यांचाही प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: सकारात्मक आहेत. त्यामुळे वर्षभरात नागरिकांना तक्रारीची संधी राहणार नाही.-सुरेश भोळे, आमदार

टॅग्स :Jalgaonजळगाव