ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 21 - शहरात डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू यासारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने अस्वच्छतेबाबत अगोदरच काळजी घेतली असती तर ही वेळ आली नसती, अशा शब्दात आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागावर रोष व्यक्त केला. दरम्यान, साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून शहरात धूरळणी (फॉगिंग) करण्यासाठी तातडीने आठ धूरळणी यंत्र खरेदी करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.शहरात साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेदिवस होणारी वाढ लक्षात घेता गुरुवारी जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिका:यांची तातडीची बैठक झाली. त्यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी हा रोष व्यक्त केला. बैठकीस आमदार चंदूलाल पटेल, महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, स्थायी समिती सभापती वर्षा खडके, महापालिका उपायुक्त चंद्रकांत खोसे, लक्ष्मीकांत कहार, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, महावितरणचे अधीक्षक दत्तात्रय अभियंता बनसोडे, कार्यकारी अभियंता संजय तडवी, डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह महापालिकेचे सर्व प्रभाग अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.काळजी घेतली असती आजार पसरले नसतेशहरात अस्वच्छता असताना साफसफाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. अजूनही नागरिक उघडय़ावर शौचास बसत आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने स्वच्छतेबाबत काळजी घेतली असती शहरात एवढे आजार पसरले नसते, असा मुद्दा आमदार भोळे यांनी मांडला. तसेच कर्मचारी कमी असतील तर त्याबाबत सांगा, असे सांगून उपाययोजना करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली. तसेच प्रशासनासोबत जनतेचीही स्वच्छतेची जबाबदारी असल्याचे आवाहन केले. डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू यासारख्या साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेमार्फत नागरिकांनी घ्यावयाची काळजीबाबतचे संदेश पोहोचविण्यासाठी सर्व प्रभागांमध्ये रिक्षाद्वारे प्रचार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उघडय़ावर शौचास बसणा:या नागरिकांना अटकाव करण्यासाठी आरोग्यविभागाचे कर्मचारी गस्त घालणार आहे. स्वच्छतेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. साथीच्या आजारांचा फैलाव गर्दीच्या ठिकाणी लवकर होत असल्याने शाळा, बस स्थानक, रेल्वे स्थानक याठिकाणी तातडीने फवारणी करण्याच्या सूचना आमदार सुरेश भोळे यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्या. महापालिकेच्या वतीने शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी आरोग्य विभागाने शहरात स्वच्छता मोहिम राबवावी. साथीच्या आजारांबाबत जनतेत जनजागृती होण्यासाठी प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागात या आजारांबाबत घ्यावयाच्या काळजीबाबतचे संदेश होडिर्ंग्ज दर्शनी भागात लावण्याचे आवाहन महापौर ललित कोल्हे यांनी केले.खड्डय़ांवर तूर्त मुरुमाचा उपायशहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांचे हाल होत आहे. त्यात सध्या पावसामुळे त्यांचे काम करता येणार नसून पावसाळ्य़ानंतरच हे काम होणार आहे. त्यामुळे सध्या खड्डय़ांमध्ये मुरुम टाकून तात्पुरता उपाय करण्यात येणार असल्याचे या वेळी ठरले.