जळगाव : मनपा निवडणुकीच्या आखाड्यात तब्बल १९७ अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात अपक्षांची भाऊगर्दी झाल्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवक व दिग्गज उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. राजकीय पक्षांनी तिकीट नाकारल्यामुळे अनेकांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यामुळे अनेक प्रभागांमधील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.मनपा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय पक्षांनी युती, आघाडी, स्वबळ असा कोणताही निर्णय न घेतल्यामुळे कोणत्यातरी पक्षाकडून तिकीट मिळेल अशी आशा अनेकांना होती. मात्र, ज्या उमेदवारांना राजकीय पक्षांकडून तिकीट मिळाले नाही. अशा उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये तीन विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. तर काही माजी नगरसेवकदेखील उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहेत.भाजपचे नाराज अपक्ष म्हणून रिंगणातइतर पक्षांमधून भाजपात आलेल्या उमेदवारांना भाजपाने संधी दिल्यामुळे भाजपाचे अनेक पदाधिकारी नाराज झाले आहेत. यामध्ये विद्यमान नगरसेविका जयश्री नितीन पाटील यांना डावलल्यामुळे त्यांनी प्रभाग ७ ड मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केल्याने त्यांचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे.तसेच गेल्या २० वर्षांपासून भाजपाचे काम पाहणाऱ्या प्रविण कुलकर्णी यांना देखील पक्षाने नाकारल्यामुळे त्यांनी देखील प्रभाग १३ क मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.अपक्षांच्या भाऊगर्दीत आजी-माजी नगरसेवकांनी ठोकला शड्डुअपक्षांच्या भाऊगर्दीमध्ये अनेक आजी-माजी नगरसेवक देखील मैदानात उतरले आहे. प्रकाश बालाणी यांनी प्रभाग १६ ड मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याखेरीज माजी नगरसेवक अरुण चांगरे यांनी देखील याच प्रभागात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.माजी नगरसेविका अबेदाबी खाटीक यांनी प्रभाग १५ ब मधून तर खाविआचे विद्यमान नगरसेवक इक्बाल पिरजादे यांनी प्रभाग १५ ड मधून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, यांच्यासह प्रत्येक प्रभागात त्या-त्या प्रभागातील काही दिग्गजांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीचे काही गणितं बिघडण्याची शक्यता आहे.अपक्ष उमेदवारांमध्ये खाविआकडून २००८ मध्ये निवडून आलेल्या हर्षा सांगोरे यांचे पती अमोल सांगोरे यांचा समावेश आहेत. प्रभाग २ ब मधून सांगोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा विरोधात भाजपाचे नवनाथ दारकुंडे व शिवसेनेचे अक्षय सोनवणे यांचे आव्हान आहे. शिवसेना-भाजपच्या लढतीत सांगोरे यांच्याकडे देखील अनेकांचे लक्ष आहे.विद्यमान नगरसेविका उज्वला बाविस्कर यांनी देखील प्रभाग २ क मधून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. मनसेकडून भाजपामध्ये गेलेल्या खुशबू बनसोडे यांना भाजपाने तिकीट न दिल्यामुळे त्यांनीही प्रभाग ३ अ व प्रभाग ४ अ अशा दोन ठिकाणाहून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.खाविआचे माजी नगरसेवक दिलीप बाविस्कर यांनी प्र्रभाग ३ ड मधून तर त्यांच्या पत्नी भावना बाविस्कर यांनी प्रभाग ३ क मधून अपक्ष म्हणून अर्ज केला आहे. मनसेच्या माजी नगरसेविका पद्माबाई सोनवणे यांना कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी प्रभाग ४ क मधून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यासह प्रभाग ३ क मध्ये रुपाली वाघ यांनी देखील भाजपाने संधी न दिल्यामुळे अपक्ष अर्ज दाखल केला.
जळगाव मनपा निवडणुकीत अपक्ष बिघडवू शकतात अनेक दिग्गजांचे गणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 1:58 PM
मनपा निवडणुकीच्या आखाड्यात तब्बल १९७ अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात अपक्षांची भाऊगर्दी झाल्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवक व दिग्गज उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
ठळक मुद्देमनपासाठी १९७ अपक्ष उमेदवार रिंगणातविद्यमान नगरसेवकांची डोकेदुखी वाढलीप्रभागांमधील राजकीय गणित बदलण्याची शक्यता