जळगाव : महापालिका प्रशासनातच कोरोनाचा संसर्ग वाढत असून कोरोना योद्धे बाधित होत असल्याचे चित्र काही दिवसांपासून आहे़ त्यात महापालिकेतील आरोग्याची प्रमुख जबाबदारी असलेले वरिष्ठ अधिकाºयांनाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे़ त्यांचा शुक्रवारी रात्रीच अहवाल पॉझिटीव्ह आला होता़ त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे़ शनिवारी ७५ नवे रुग्ण आढळून आले त्यात शंकरअप्पा नगरात संसर्ग वाढला असून या भागात दहा बाधित रुग्ण आढळून आले आहेत़ शहरातील चार बाधितांसह जिल्हाभरात ९ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ यासह शहरातील ९६ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले़ निगेटीव्ह मुलगी बाधितांमध्ये दाखलशहरातील एका कुटुंबातील निगेटीव्ह अहवाल आलेल्या मुलीलाही बाधित सांगून तिला बाधितांच्या कक्षात तब्बल सात तास दाखल करण्यात आले़ आई, भावासह राहिलेल्या या मुलीचा अहवाल निगेटीव्ह असल्याचे समजल्यानंतर सायंकाळी सात वाजता तिला घरी सोडण्यात आले़ हा गंभीर प्रकार शासकीय अभियांत्रिकीमधील कोविड केअर सेंटरमध्ये घडला़ या कुटुंबाने खासगी लॅबमध्ये तपासणी केली. त्यापैकी आई व मुलगा बाधित आढळले. मुलीचे अहवाल निगेटीव्ह होते़ तिचा अहवालही पॉझिटीव्ह सांगून तिघांनाही एका कक्षात दाखल करण्यात आले़ मात्र अहवाल निगेटीव्ह असल्याचे कळाल्यावर मुलीला घरी सोडण्यात आले़
जळगाव मनपाचे आरोग्य प्रमुखही बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 12:43 PM