शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उच्च न्यायालयात जळगाव मनपाला दिलासा : सील केलेली खाती उघडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:12 PM

तीन महिन्यात मनपाला डिआरएटीत जाण्याची संधी

जळगाव : हुडको कर्जप्रकरणी डिआरटीने मनपाचे सील केलेली खाती उघडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी हुडकोला दिले आहेत. तसेच तीन महिन्यात या आदेशाविरोधात डिआरएटीमध्ये जाण्याची संधी देण्यात आली आहे. या तीन महिन्यात हुडकोशी चर्चा करून न्यायालयाच्या बाहेर हे प्रकरण मिटविण्याचा सल्ला देखील दिला असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली.हुडको कर्जप्रकरणी डिआरटीच्या आदेशाने २६ जून रोजी मनपाची सर्व खाती सील करण्यात आली होती. गेल्या आठ दिवसांपासून मनपाचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. मुंबई उच्च न्यायालयात मनपाने दाखल केलेल्या पुनर्विलोकन याचिकेदरम्यान मनपाने हुडकोने सील केलेली खाती उघडण्याची मागणी केली. त्यानंतर यावर हुडकोच्या वकीलांनी यावर आक्षेप घेतला. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने तब्बल ५ लाख नागरिकांना यामुळे सुविधा मिळणे कठीण होत असल्याचा मुद्दा मनपाच्या वकीलांनी मांडल्यानंतर उच्च न्यायालयाने मनपाला ५० हजार रुपये भरण्याचे आदेश देत मनपाची खाती उघडण्याचे आदेश हुडकोला दिले. न्यायालयाच्या आदेशाची प्रत दोन दिवसात मिळणार असून, या प्रतमध्ये न्यायालयाने अजून दिलेल्या सूचनांची माहिती मिळू शकेल, अशी माहिती मनपाचे वकील हार्बट ए. नोरोन्हा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.दिल्लीत हुडकोच्या अधिकाऱ्यासोबत आयुक्तांची चर्चाउच्च न्यायालयात दिलासा मिळाल्यानंतर मनपाकडून कर्जफेडीसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांची गुरुवारी दिल्लीत हुडकोच्या अधिकाऱ्यांसोबत या बैठक झाली. या बैठकीत एकरक्कमी कर्जफेडीबाबत चर्चा झाली. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नगरविकास मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या सूचनेवरूनच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सीए अनिल शहा देखील उपस्थित होते.प्रशासनाने डिआरएटीत केलेली चूक टाळण्याची गरजउच्च न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे आता मनपा प्रशासनाने हुडको कर्ज प्रश्नी गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. डिआरएटीत जानेवारीमध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान मनपा प्रशासनाने केलेली चूक आता पुन्हा न करण्याची गरज आहे. तसेच सत्ताधाºयांनी देखील तीन महिन्यांचा काळात हुडकोप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण पुन्हा हा विषय डिआरएटी मध्ये गेल्यास लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिआरएटीत जाण्याचा अगोदर प्रश्न मार्गी लागण्यासाठी सत्ताधाºयांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.हुडकोला १५० कोटींचा दिला जाईल प्रस्तावहुडकोकर्ज प्रकरणी डिसेंबर मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुडकोच्या अधिकाºयांशी चर्चा केली. यात हुडकोने मनपावर असलेल्या ४६५ कोटी रुपयांच्या देणीतून १६५ कोटी रुपये माफ करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, तेव्हाही हुडको ३०० कोटी रुपयांवर ठाम होती.आता मनपाला डिआरएटी मध्ये जाण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असून, न्यायालयाने हे प्रकरण आपसात तडजोडीतून मिटविण्याचा सल्लाही दिला असल्याने हुडकोसोबत लवकरच चर्चा केली जाणार असल्याची माहिती आमदार भोळे यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून मध्यंतरी शासनाने ही रक्कम भरण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे हुडकोला तडजोड करण्यासाठी १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला जाणार आहे. तीन महिन्यात शासनाकडून ५० कोटी रुपयांप्रमाणे ही कर्जफेड केली जावू शकते असेही आमदार म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव