जळगाव,दि.15- मनपात अनुकंपा तत्वावर भरावयाच्या जागांबाबत आर्थिक देवाण-घेवाणीला ऊत आला असून 16 जणांचे नियुक्ती आदेश तयार करण्यात आले आहेत. दरम्यान आयुक्त, उपायुक्तांच्या मंजुरीनंतर आदेशात खाडाखोड करून नियुक्तीचे पद बदलणा:या आस्थापना विभागातील वरिष्ठ लिपिकाला उपायुक्तांनी आयुक्तांच्या सूचनेवरून बडतर्फीची नोटीस बजावली आहे.
मनपा आस्थापना विभागात कर्मचा:यांच्या अडवणुकीचे व त्यांच्याकडून कामांसाठी पैसे उकळण्याचे प्रकार वाढीस लागलेले असून वरिष्ठांकडे टिपणी ठेवण्यासाठी देखील कर्मचा:यांकडून पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
मात्र काम अडलेले असल्याने जाहीरपणे बोलण्याचे धाडस मनपा कर्मचा:यांना होत नसल्याचे चित्र आहेत. त्यातच अनुकंपा तत्वावर पदे भरण्यासाठीही मयत कर्मचा:यांच्या वारसांचे मनपात सातत्याने हेलपाटे सुरूच आहेत.
रिक्त पदांच्या 10 टक्के पद अनुकंपाने भरण्याचा शासन निर्णय आहे. तर अनुकंपाची यादी मोठी आहे. त्यापैकी यादीतील पहिल्या 16 वारसांना अनुकंपाने नियुक्ती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र त्यातही मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप होत आहे.