जळगाव : राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला जळगाव महानगरपालिकेत प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी १५ वर्षांपासून अयशस्वी झुंज द्यावी लागत आहे. सन २०१३ मध्ये सर्वाधिक ४७ उमेदवार दिल्यानंतर यावेळी काँग्रेसला केवळ १७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविता आले आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी कुटुंबातील उमेदवार विजयी करण्याच्या आवाहनाला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुन्हा बगल दिली आहे.जळगाव महानगरपालिकेच्या स्थापनेपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निवडणुकीत उमेदवार उभे करीत आहे. काँग्रेसने सन २००३ मध्ये २४ उमेदवार दिले होते. त्यानंतर झालेल्या २००८ च्या निवडणुकीत २६ तर सन २०१३ मध्ये सर्वाधिक ४७ उमेदवार दिले होते. तिन्ही निवडणुकीत मात्र काँग्रेसला आपले खाते देखील उघडता आले नाही.या निवडणुकीत काँग्रेसची सूत्रे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. महानगरप्रमुख डॉ.अर्जुन भंगाळे व कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी उमेदवारी निश्चितीपासून ते अर्ज भरण्यापर्यंतचे कामे सांभाळली आहेत. बुधवारी दुपारी माजी मंत्री अब्दुल सत्तार, निरीक्षक विनायकराव देशमुख, जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. या निवडणुकीत काँग्रेसने १७ जणांना उमेदवारी दिली.काँग्रेस पदाधिकाºयांचे कुटुंबिय उमेदवारीपासून दूरमाजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसच्या पदाधिकाºयांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याचे आवाहन केले होते. मात्र एकाही नेत्याने आपल्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकाला उमेदवारी देण्यासाठी स्वारस्य दाखविलेले नाही.
जळगाव मनपा निवडणूक : काँग्रेसचे केवळ १७ जागांवर उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 8:18 PM
राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला जळगाव महानगरपालिकेत प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी १५ वर्षांपासून अयशस्वी झुंज द्यावी लागत आहे. सन २०१३ मध्ये सर्वाधिक ४७ उमेदवार दिल्यानंतर यावेळी काँग्रेसला केवळ १७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविता आले आहे.
ठळक मुद्देगेल्या निवडणुकीत होते काँग्रेसचे सर्वाधिक ४७ उमेदवारकेवळ १७ जागांवर दिले काँग्रेसने उमेदवारकाँग्रेसच्या वाट्याला १५ वर्षांपासून अपयश