आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १७ - सप्टेंबर महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित केला असून २८ फेब्रुवारी पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव आरक्षित जागांसह तयार करण्याचे आदेश दिले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी शुक्रवारी मनपात प्रमुख अधिकाºयांची बैठक घेऊन त्यांना आयोगाच्या आदेशांची माहिती दिली.महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांच्या पाच वर्षाच्या कालावधीची मुदत १९ सप्टेंबरला पूर्ण होत आहे. त्यामुळे या तारखेपूर्वी महापालिकेची निवडणूक घेणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली असून गेल्या महिन्यात महापालिकेत मतदान यंत्रे ठेवण्याचे स्ट्रॉग रूम तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या स्ट्रॉक रूमची पाहणी करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या तीन महिला अधिकाºयांनी मनपात येऊन स्ट्रॉग रूमची पाहणी केली होती. त्यानंतर आता प्रभाग रचनेच्या तयारीला सुरूवात झाली करण्यासाठी कार्यक्रम घोषित केला आहे.२८ फेबु्रवारी ते २४मे पर्यंतचे नियोजनप्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव (अनु.जाती व जमातीकरीता आरक्षित प्रभागांसह) तयार करणे - २८ फेब्रुवारी पर्यंतप्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव (अनु.जाती अनु.जमाती करीता आरक्षित प्रभागांसह) तपासणी करून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणे- १५ मार्चपर्यंत.प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे - २७ मार्च पर्यंतसोडत काढण्यासाठी (नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांकरिता) नोटीस प्रसिद्ध करणे ३१ मार्च पर्यंत.नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला वॉर्डांसाठी सोडत काढणे - ४ एप्रिलपर्यंतप्रारूप प्रभाग रचनेची (सोडतीनंतर) अधिसूचनेची राजपत्रात प्रसिद्धी - ९ एप्रिल.प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे - ९ एप्रिलप्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेणे - ३ मे पर्यंत.हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन ती माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणे - १४ मे पर्यंतसूचना व हरकतींवर विचार करून निर्णय घेणे ( राज्य निवडणूक आयुक्त) ९ मे पर्यंत.प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्धी - २४ मेनव्या रचनेनुसार १९ प्रभागमहापालिकेच्या सध्याच्या प्रभागांची संख्या ही ३७ आहे. तर वॉर्डांची संख्या ही ७५ आहे. नव्या रचनेनुसार या निवडणुकीत प्रभागांची संख्या ही १९ असेल. यात १८ प्रभागांमधील सदस्यांची संख्या ही ४ असेल तर एका प्रभागात ३ सदस्य असतील.खान्देश विकास आघाडीचे सर्वाधिक सदस्यमहापालिकेत खान्देश विकास आघाडी सत्तेत आहे. या आघाडीचे सर्वाधिक ३३ सदस्य आहेत. त्या खोलोखाल भाजपा १४, मनसे व राष्टÑवादी प्रत्येकी ११, शिवसेना २, जनक्रांती २, मविआ व अपक्ष प्रत्येकी १ अशी स्थिती आहे.
जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा बिगूल, जिल्हाधिकाºयांनी घेतली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:39 PM
प्रभाग रचनेचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर
ठळक मुद्देनव्या रचनेनुसार १९ प्रभागखान्देश विकास आघाडीचे सर्वाधिक सदस्य