जळगाव : महानगरपालिका निवडणुकीसाठी आता केवळ १८ दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांनी माघारीच्या मुदतीआधीच प्रचाराला सुरुवात केली आहे. रॅली तसेच मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींना वेग आला आहे. शुक्रवारी शिवसेना, भाजपासह राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आपआपल्या प्रभागांमध्ये मतदारांच्या भेटी घेतल्या.शुक्रवारी अनेक प्रभागांमध्ये भाजपाकडून आमदार सुरेश भोळे, माजी महापौर ललित कोल्हे यांनी प्रचार केला. तर शिवसेनेकडून देखील माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी उपमहापौर सुनील महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांनी शिवसेनेच्या काही उमेदवारांच्या प्रभागात जावून प्रचार केला.सोशल मीडियावरील प्रचारावर भरसध्याचा डीजीटल काळात सोशल मीडिया निवडणूक प्रचाराचे मोठे साधन बनले आहे. याच साधनाचा वापर उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात सुरु झालेला दिसून येत आहे. अनेक उमेदवारांनी सोशल मीडियावरील प्रचारासाठी स्वतंत्र ‘वॉर रुम’ तयार केली असून, त्या ठिकाणाहून आपल्या कार्यकर्त्यांव्दारे जोरदार प्रचार सुरु केला आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप या सोशल साईट्सचा वापर देखील उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.रमेशदादांनी घेतला उमेदवारांच्या तयारीचा आढावामाजी महापौर रमेशदादा जैन यांनी देखील शुक्रवारी ८ वाजता शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची खान्देश कॉम्पलेक्समधील खाविआच्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत सर्व उमेदवारांकडून सुरु असलेल्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला. तसेच लवकरच प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करु अशी महिती रमेशदादा जैन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
जळगाव महापालिका निवडणूक : माघारीआधीच प्रचाराला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 11:44 AM
रॅली, प्रत्यक्ष भेटीवर भर
ठळक मुद्देसोशल मीडियावरुनही जोरदार प्रचारउमेदवारांच्या तयारीचा आढावा