ठळक मुद्देआचारसंहिता कक्षाकडे ५० तक्रारी प्राप्ततक्रार केल्यानंतर काही मिनीटातच पोहचत होते कर्मचारीसमता नगरात आढळलेली कार पोलीस स्टेशनला
जळगाव : आचारसंहिता कक्षाकडे सकाळी ७.३० वाजता मतदानास प्रारंभ झाल्यापासून दुपारी सव्वा वाजेपर्यंत पैसे वाटप होत असल्याबाबत विविध भागातून तब्बल ५० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.मनपा निवडणुकीसाठी प्रभागनिहाय १९ पथके व ३ भरारी पथके त्याशिवाय पोलिसांची स्वतंत्र पथके असल्याने तक्रार मिळताच काही मिनीटातच कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल होऊन चौकशी करीत होते. मात्र केवळ समतानगर परिसरात हनुमान मंदिराजवळ पैसे वाटपासाठी आलेली कार पकडल्याच्या वृत्तात तथ्य आढळून आले. संबंधीत लोक वाहन लॉक करून पळून गेल्याचे आढळून आल्याने ते वाहन पोलीस स्टेशनला नेण्यात आले. तेथे पंचनामा करून ते वाहन उघडून आत किती रक्कम आहे? त्याची तपासणी करण्यात आली.