शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

जळगाव मनपा निवडणूक : बारा ठिकाणी शिवसेना आणि भाजपामध्ये सरळ लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:24 PM

माघारीनंतर झाले लढतींचे चित्र स्पष्ट

ठळक मुद्देआमदार पत्नींचीही सरळ लढतप्रभाग १२ मध्ये ३ लढती समोरासमोर

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर सर्व लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. १२ ठिकाणी शिवसेना व भाजपा उमेदवारांमध्ये आमने-सामने लढत होणार असून, काही ठिकाणी तिरंगी तर काही प्रभागात चौरंगी लढत रंगणार आहेत.१२४ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ३०३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच सर्व ७५ जागांवर भाजपाने उमेदवार उभे केले आहेत. तर शिवसेनेने ७० ठिकाणी उमेदवार दिले असून, पाच ठिकाणी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवारांना पाठींबा देण्यात आला आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसकडून ४२, कॉँग्रेसकडून १६, एमआयएम व समाजवादी पक्षाचे प्रत्येकी सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छाननीत वैध ठरलेल्या २०१ अपक्ष उमेदवारांपैकी ११९ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ८२ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.शिवसेना व भाजपात काट्याची लढतया निवडणुकीत भाजपा व शिवसेनेमध्येच काट्याची लढत रंगणार असून, बारा ठिकाणी आमने सामने लढत होणार आहे. यामध्ये प्रभाग १ ब मध्ये शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका संगीता दांडेकर व भाजपाच्या सरीता नेरकर यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग ४ क मध्ये भाजपच्या चेतना चौधरी व शिवसेनेच्या सैय्यद सिनत अयाजअली यांच्यात लढत आहे. प्रभाग १३ ब मध्ये भाजपच्या ज्योती चव्हाण व शिवसेनेकडून दिपीका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.प्रभाग १२ मध्ये ३ लढती समोरासमोरप्रभाग १२ ब, क व ड मधील तिन्ही लढती या शिवसेना व भाजपाच्या उमेदवारांमध्ये होणार आहेत. प्रभाग १२ ब मध्ये भाजपच्या नगरसेविका उज्वला बेंडाळे यांच्या समोर शिवसेनेच्या पुष्पा पाटील यांची लढत आहे. प्रभाग १२ क मध्ये शिवसेनेच्या मंदाकिनी जंगले यांच्या समोर भाजपच्या गायत्री राणे यांचे आव्हान आहे. १२ ड मध्ये शिवसेनेचे अनंत जोशी व भाजपचे जीवन अत्तरदे यांच्यात लढत आहे.भारती सोनवणे व जयश्री धांडे, सुनील खडके व प्रकाश बेदमुथा यांच्या लढतीकडे लक्षप्रभाग ४ ब व प्रभाग १७ क मध्ये तगडी लढत रंगणार आहे. प्रभाग ४ ब मध्ये भाजपने माजी उपमहापौर भारती सोनवणे यांना मैदानात उतरविले आहे.त्यांच्या विरोधात शिवसेनेने माजी महापौर जयश्री धांडे यांना मैदानात उतरविले आहे. त्याचप्रमाणे १७ क मध्ये देखील भाजपचे मनपा विरोधी पक्षनेते वामनराव खडके यांचे पूत्र सुनील खडके हे भाजपाकडून तर शिवसेनेकडून प्रकाश बेदमुथा हे दोघं आमने-सामने लढत आहेत.आमदार पत्नींचीही सरळ लढतभाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे या प्रभाग ७ अ मध्ये रिंगणात असून त्यांची लढत शिवसेनेच्या साधना श्रीश्रीमाळ यांच्याशी होणार आहे. तर शिवसेनेचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे यांचीही प्रभाग १९ अ मध्ये थेट लढत असून, त्यांच्यासमोर भाजपच्या तडवी शरिफा रहेमान यांचे आव्हान आहे.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव