जळगाव : मनपा निवडणुकीसाठी आता अवघे १२ दिवस शिल्लक असून राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने आपला जाहीरनामा जाहीर केला नसून, नेहमीच्या जाहीरनाम्यापेक्षा यंदाच्या जाहीरनाम्यामध्ये वेगळेपण देण्यावर राजकीय पक्षांचा भर राहणार असल्याचे सध्याचा तयारीवरुन दिसून येत आहे.मनपा निवडणुकीसाठी माघारीनंतर सर्व चित्र स्पष्ट झाले असून, राजकीय रणधुमाळीला देखील सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजकीय पक्षांकडून आपला जाहीरनामा जाहीर केला जातो. मात्र, यंदा जाहीरनामा जाहीर करण्यास सर्वच राजकीय पक्षांकडून उशीर केला जात आहे.कोणत्या प्रश्नांना राहणार महत्व याकडे लक्षमहानगरपालिकेची आर्थिक अवस्था बिकट असून, हुडको, जिल्हा बॅँकेचे कर्ज महानगरपालिकेवर आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सुविधा मिळणेही कठीण आहे. अशा परिस्थितीत शहरातील नागरिकांचे कोणते प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय पक्षांकडून भर राहील याबाबत उत्सुकता आहे.हुडकोचे कर्ज फेड, गाळ्यांचा प्रश्न, समांतर रस्त्यांच्या प्रश्नांसह शहरातील उद्यान, गटारी, रस्ते, मनपाच्या शाळा या सुविधांवर राजकीय पक्षांचा भर राहणार असल्याची शक्यता आहे.
जळगाव मनपा निवडणूक : जाहीरनाम्यांची अद्याप प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 1:07 PM
मनपा निवडणुकीसाठी आता अवघे १२ दिवस शिल्लक असून राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने आपला जाहीरनामा जाहीर केला नसून, नेहमीच्या जाहीरनाम्यापेक्षा यंदाच्या जाहीरनाम्यामध्ये वेगळेपण देण्यावर राजकीय पक्षांचा भर राहणार असल्याचे सध्याचा तयारीवरुन दिसून येत आहे.
ठळक मुद्देप्रत्येक राजकीय पक्षाचा वेगळेपण देण्यावर भरविकासाच्या विषयांचा असेल समावेशमनपा निवडणुकीसाठी अवघे १२ दिवस शिल्लक