जळगाव : राजकारणात आयाराम गयाराम हा प्रकार सुरुच असतो. याचा मात्र आम्हाला काही फरक नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी महापौर ललित कोल्हे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत दिली. आमच्याजवळ सर्व जागांसाठी प्रबळ उमेदवार असून जनताच योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.मनसेच्या सर्व १२ नगरसेवकांसह महापौर ललित कोल्हे यांनी १० दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच गत मनपा निवडणुकीनंतर खान्देश विकास आघाडीस पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत सुरेशदादांसोबत राहून निवडणूक लढविण्याचे त्यांनी जाहीर केले आणि लगेचच आपला निर्णय फिरवून भाजपात रविवारी सायंकाळी आपल्या ५ नगरसेवकांसह प्रवेश केला.या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी रात्री त्यांची भेट घेतली असता ‘लोकमत’ शी बोलताना त्यांनी सांगितले की, राजकारणात अशा घडामोडी घडतच असतात. याबाबत आपल्याला आश्चर्य नाही. आम्ही सक्षम असून जनताच काय ते ठरवेल. आमच्या सोबत जनता नेहमी राहीली आहे व आताही राहील याचा विश्वास असल्याचेही सुरेशदादांनी सांगितले.रात्री उशिरा पर्यंत कार्यकर्त्यांची गर्दीसुरेशदादा जैन यांच्या शिवाजी नगरातील निवासस्थानी इच्छुक उमेदवार तसेच कार्यकर्ते यांची प्रचंड गर्दी होती. राजकीय घडामोडीची या ठिकाणीही चर्चा होती. मात्र जे आता सोबत नाही, ते गेल्या निवडणुकीतही विरोधात होते. त्यामुळे काहीच फरक पडणार नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.युती झाली तर ठिकयुती होणार की नाही, याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र आम्हाला अजूनही अधिकृत काही निरोप नाही. त्यामुळे याबाबत आताच अधिक बोलणे योग्य ठरणार नाही. परंतु युती झाली तरी ठिक व नाही झाली तरी काही चिंता नाही. आमच्याजवळ सर्व ७५ जागांवर चांगले उमेदवार आहेत, असेही सुरेशदादा जैन यांनी सांगितले.
जळगाव मनपा निवडणूक : आयाराम- गयारामांचा फरक नाही - सुरेशदादा जैन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 12:55 PM
जनता योग्य निर्णय घेईल
ठळक मुद्देसर्व जागांसाठी सक्षम उमेदवार तयार