आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २२ - भाजपा व शिवसेनेच नेते पालघर येथील लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने जळगाव महापालिकेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुरेशदादा जैन व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणारी युतीची बैठक अद्याप होऊ शकलेली नाही.२८ मे रोजी लोकसभेच्या पालघर मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोट निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपा व शिवसेनेने एकमेकांविरोधात उमेदवार उभे केल्याने ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीसाठी भाजपाची सूत्रे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली आहेत. त्यामुळे गिरीश महाजन गेल्या आठवड्याभरापासून या निवडणुकीच्या प्रचारात व अन्य बाबींकडे लक्ष घालून आहेत. तसेच राज्यात नाशिक, रत्नागिरी येथे झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या व्यस्ततेमुळे देखील ही बैठक होवू शकली नाही.बैठकीनंतर राजकीय घडामोडींना येणार वेगमनपा निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनादेखील मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्यापही युती किंवा स्वबळाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने भाजपा व खाविआ नगरसेवकांचे लक्ष मुंबई येथे होणाऱ्या बैठकीकडे लागले आहे. या बैठकीत होणाºया निर्णयानंतरच राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
जळगाव मनपा निवडणुकीसाठी होणारी युतीबाबतची बैठक ‘पालघर’च्या पोटनिवडणुकीमुळे लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:55 AM
भाजपा-सेनेचे नेते व्यस्त
ठळक मुद्देआठवडाभरात बैठक होण्याची शक्यताबैठकीनंतर राजकीय घडामोडींना येणार वेग