जळगाव : मनपा निवडणुकीसाठी राष्टÑवादी काँग्रेसने समाजवादी पार्टी व काँग्रेसची आघाडी निश्चित झाली आहे.आता केवळ जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती राष्टÑवादीकाँग्रेसचे निरीक्षक तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र जागा वाटपाबाबत रात्री उशीरापर्यंत बैठका सुरू होत्या.राष्टÑवादी काँग्रेसतर्फे इच्छुकांच्या मुलाखती आटोपल्या असून उमेदवारी निश्चित करण्याचे तसेच काँग्रेस व समाजवादी पार्टीसोबत आघाडी करण्याच्यादृष्टीने चर्चेसाठी पक्षाचे निरीक्षक दिलीप वळसे पाटील हे मंगळवार, १० रोजी सकाळी शहरात दाखल झाले.दुपारी दीड वाजेपर्यंत त्यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, निरीक्षक रंगनाथ काळे, जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, अॅड.रविंद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, यांच्यासोबत चर्चा करून मनपा निवडणुकीसाठी राष्टÑवादीचे उमेदवार निश्चित केले. दुपारी समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाºयांशी चर्चा केली. त्यात काँग्रेसचे निरीक्षक विनायकराव देशमुख, डॉ.हेमलता पाटील, महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील,माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, डी.जी. पाटील आदी उपस्थित होते. मात्र ती चर्चा अपूर्ण राहिल्याने सायंकाळी पुन्हा बैठक झाली. त्यानंतर रात्री जेवणाची विश्रांती घेत पुन्हा मध्यरात्रीपर्यंत बैठक चालली.तिन्ही पक्ष मिळून सर्व ७५ जागा लढविणारवळसे पाटील यांनी सांगितले की, निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना मग या आघाडीतील कोणत्याही पक्षाचा असो, त्याला उमेदवारी देण्याच्या दृष्टीने चाचपणी होत आहे. तिन्ही पक्ष मिळून सर्व ७५ जागा लढविण्याचा प्रयत्न आहे. तसेच इतर पक्षातील अनेक कार्यकर्तेही संपर्क साधत आहेत. ज्या उमेदवारांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे, त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ए.बी. फॉर्म बुधवार, ११ रोजी दिला जाईल. किती उमेदवार निवडून येतील? याबाबत मात्र आजच सांगणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.दिग्गज उमेदवाराला ऐनवेळीही एन्ट्रीबुधवारी शेवटच्या दिवशी भाजपा, खाविआकडून उमेदवारी नाकारलेले उमेदवार राष्टÑवादीकडे आल्यास उमेदवारी देणार का? याबाबत विचारणा केली असता वळसे पाटील म्हणाले की,उमेदवार किती ताकदवान आहे? त्याचा पक्षाला फायदा होणार असेल तर दरवाजे उघडे आहेत.खाविआशी आघााडीचा पर्यायही खुलाभाजपा-सेनेची (खाविआ) युती झाली नाही तर खाविआशी आघाडी करणार का? असे विचारले असता राजकारणात काहीही शक्य असते, असे सांगत खाविआशी आघाडीचा पर्यायही खुला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जळगाव महापालिका निवडणूक : राष्टÑवादीसह काँग्रेस, सपाची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:24 PM
दिलीप वळसे पाटील यांची माहिती
ठळक मुद्देजागावाटपाबाबत मध्यरात्रीपर्यंत बैठका