जळगावात मनपा निवडणुकीत आघाडीमुळे ‘राष्टÑवादी’च्या आशा पल्लवीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:16 PM2018-07-12T13:16:25+5:302018-07-12T13:17:09+5:30

विद्यमान चौघा नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी

In the Jalgaon municipal elections, the hope of 'Nation-like' | जळगावात मनपा निवडणुकीत आघाडीमुळे ‘राष्टÑवादी’च्या आशा पल्लवीत

जळगावात मनपा निवडणुकीत आघाडीमुळे ‘राष्टÑवादी’च्या आशा पल्लवीत

Next
ठळक मुद्दे४९ जागांवर दिले उमेदवार४ विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी

जळगाव : मागील मनपा निवडणुकीच्यावेळी स्वतंत्रपणे लढलेल्या काँग्रेस, राष्टÑवादी तसेच समाजवादी पार्टीने गतवेळची चुक सुधारत यंदा एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतविभाजन टळणार असून मागील निवडणुकीत ११ उमेदवार विजयी झालेल्या राष्टÑवादीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर काँग्रेस व सपाचाही मनपात प्रवेश करण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
राष्टÑवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी जळगाव मनपाची निवडणूक गांभीर्याने घेतली असून त्यांच्या सूचनेवरूनच जिल्हा निरीक्षक तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, दुसरे निरीक्षक रंगनाथ काळे यांनी जळगावात येत समविचारी पक्षांशी आघाडीसाठी चर्चेच्या फेऱ्या करून आघाडी स्थापन केली. तसेच जागा वाटपही पार पाडले. इतकेच नव्हे तर उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतही स्वत:च निर्णय घेतला. निवडून येण्याच्या क्षमतेवरच उमेदवारी दिल्याचा दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे.
४ विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी
राष्ट्रवादीचे मागील निवडणुकीत ११ उमेदवार निवडून आले होते. मात्र त्यापैकी ४ नगरसेवक शिवसेना तर ४ भाजपात गेले आहेत. राष्टÑवादीने विद्यमान नगरसेवक दिपाली दुर्गेश पाटील यांना प्रभाग क्र. ९-क मधून, लता अंबादास मोरे यांना १०-ब मधून तर अश्विनी विनोद देशमुख यांना १३-क मधून उमेदवारी दिली असून १३-ड मध्येही त्यांचा डमी अर्ज टाकण्यात आला आहे. तर प्रभाग १ अ मध्ये विद्यमान नगरसेवक रविंद्र मोरे यांच्या कन्या प्रियंका यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याखेरीज खाविआच्या माजी नगरसेविका आशा शांताराम सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
समाजवादी पार्टीतर्फे सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल
मनपा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीच्यावतीने सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. राष्टÑवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी व काँग्रेसची आघाडी होऊन यामध्ये समाजवादी पार्टीला सहा जागा देण्यात आल्या. त्यात प्रभाग क्रमांक दोन, चार १५, १६ मध्ये प्रत्येकी एक व प्रभाग क्रमांक १८मध्ये दोन जागा सोडण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रभाग क्रमांक चार व १५ वगळता इतर प्रभागात ठरल्याप्रमाणे पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मात्र प्रभाग क्रमांक चार मध्ये उमेदवार नसल्याने प्रभाग क्रमांक १५मध्ये १५ - क ही एक जागा मिळाली असताना तेथे ‘क’ सह १५ ‘ब’ साठीही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तांत्रिक अडचण आल्यास यातील शिल्लक अर्ज मागे घेण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारुन नदवी यांनी सांगितले.
खबरदारीचा उपाय म्हणून डमी उमेदवार... उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतल्याने नाचक्की होण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले असून त्यामुळे पक्षाचा उमेदवारच रिंगणात उरत नाही. त्यामुळे राष्टÑवादीने या निवडणुकीत खबरदारी घेत अनेक जागांवर डमी उमेदवार दिले आहेत. एका उमेदवाराचा अर्ज बाद ठरला अथवा त्याने ऐनवेळी माघार घेतल्यास दुसरा उमेदवार पक्षाचा अधिकृत उमेदवार ठरणार आहे.
गतवर्षीपेक्षा उमेदवार कमी
राष्टÑवादीने यंदा काँग्रेस व सपाशी आघाडी करीत स्वत: ४९ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर काँग्रेसने १७ व सपाने ६ जागांवर उमेदवार दिले आहेत. मागील निवडणुकीत राष्टÑवादीचे ६२ उमेदवार रिंगणात होते. त्यातील ११ विजयी झाले होते.
अनेक जागांबाबत घोळ
काँग्रेस, राष्टÑवादी, सपाच्या जागा वाटपासाठी बैठकांमागून बैठका झाल्या. काँग्रेस व राष्टÑवादीची चर्चा सर्वाधिक लांबली. मात्र तरीही कोणती जागा कोण लढविणार याबाबत घोळ कायम राहिला. काही जागांवर काँग्रेस व राष्टÑवादीनेही उमेदवार दिल्याचे आढळून आले.

जातीयवादी पक्षांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी कमी जागा मिळाल्यातरी धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी करण्याचे ठरल्याने सहा जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली. त्यानुसार सहा जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
- मुफ्ती हारुन नदवी,
जिल्हाध्यक्ष, समाजवादी पार्टी.

Web Title: In the Jalgaon municipal elections, the hope of 'Nation-like'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.