ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 20 - शहरातील शिवाजीनगर भागात सफाईच्या कामात कसूर आढळल्याने मनपा आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षकासह तिघांना निलंबित केले असून आयुक्तांनी आरोग्य कर्मचा:यांची बाजू ऐकून न घेता कारवाई केली, आरोग्य कर्मचा:यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी आरोग्य कर्मचा:यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. निलंबन रद्द न केल्यास आरोग्य कर्मचा:यांनी सामूहिक रजा व राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी सकाळी शिवाजीनगर भागात मनपा उपायुक्त लक्ष्मीकांत कहार व मनपा आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी सकाळी केलेल्या पाहणीत या भागात घाणीचे साम्राज्य आढळून आले. त्यानुसार मनपा आयुक्तांनी मनपाच्या तीन कर्मचा:यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. या कारवाई विरोधात आरोग्य विभागातील अधीक्षक, सहाय्यक निरीक्षक व मुकादमांमध्ये संताप निर्माण झालेला आहे. यामुळे शनिवारी या कर्मचा:यांनी महापौर, उपमहापौर व आयुक्तांना निवेदन देवून ही कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे. तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी प्रामाणिक काम करीत असताना तसेच कुठलाही दोष नसताना निलंबन व दंडाची कारवाई प्रशासनाकडून केली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आरोग्य कर्मचा:यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराच्या स्वच्छतेसाठी 970 झाडू कामगार, 2 हजार 106 गटार कामगार व 160 कचरा वाहनांवरील कर्मचारी अशा 3 हजार 236 कामागारांचे आवश्यकता आहे. मात्र शहरात सध्या 925 जणांकडून हे काम करुन घेतले जात आहे. यामुळे शहराची 100 टक्के स्वच्छता करणे अशक्य असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
जळगाव मनपा कर्मचा:यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा
By admin | Published: May 20, 2017 6:03 PM