जळगाव : मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्या ऐवजी डॉ.विकास पाटील यांची नियुक्ती करण्याआधी डॉ.पाटील यांच्यावरील आरोपांबाबत चौकशी पुर्ण करुन त्यांची नियुक्ती व्हावी असा ठराव मंगळवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला होता. मात्र, या ठरावाऐवजी चौकशी सुरु असताना डॉ.विकास पाटील यांची नियुक्ती करण्यात यावी असा दबाव सत्ताधारी भाजपातील बड्या पदाधिकाऱ्यांकडून मनपा प्रशासनावर आणला जात असल्याची माहिती मनपाच्या सुत्रांनी दिली आहे.त्यामुळे मनपा आरोग्य अधिकारी बदलावरुन सध्या महापालिकेचे राजकारण तापलेले दिसून येत आहे. मंगळवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपाकडून आरोग्य अधिकारी उदय पाटील हे अभियंता असल्याने त्यांच्या जागेवर वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास असलेले डॉ.विकास पाटील यांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावाला शिवसेनेकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. डॉ.विकास पाटील यांच्यावर फिनाईल खरेदीप्रकरणात आरोप असून, त्यांची चौकशी थांबलेली आहे. ती चौकशी पुर्ण करुन ते निर्दोष आढळल्यास त्यांची नियुक्ती करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यानंतर महासभेने देखील डॉ.पाटील यांची चौकशी करूनच त्यांची नियुक्ती करण्याचा ठराव केला होता.बदलीचे अधिकार आयुक्तांचेचमहासभेने जरी मनपा आरोग्य अधिकारी यांची बदली करण्याचा ठराव केला असला तरी त्यांच्या बदलीचे सर्व अधिकार हे आयुक्तांचेच आहेत.त्यामुळे सत्ताधाºयांनी केलेल्या ठरावानंतर आयुक्त देखील काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे आहेत. तसेच डॉ.विकास पाटील यांची चौकशी केव्हा सुरु होईल ? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.चौकशीअधीन राहून नियुक्तीचा ठराव करण्याचा हालचालीमहासभेने ठराव केल्यामुळे डॉ.विकास पाटील यांची नियुक्ती करता येणार नाही. त्यांच्या नियुक्तीसाठी आधी त्यांची चौकशी करावी लागणार आहे. त्यामुळेच सत्ताधारी गटातील एका बड्या पदाधिकाºयाकडून या ठरावाला विरोध केला जात आहे. त्यामुळे या बड्या पदाधिकाºयाकडून मनपातील एका अधिकाºयावर महासभेत करण्यात आलेल्या ठरावात बदल करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. चौकशीनंतर डॉ.विकास पाटील यांना रुजू न करता चौकशी सुरु असतानाच त्यांची नियुक्ती करण्याचा ठराव महासभेने घेतला आहे. असा ठराव करण्याचा सूचना देखील बड्या पदाधिकाºयाने दिल्या असल्याची माहिती मनपा प्रशासनातील सुत्रांनी दिली आहे.नाशिकच्या मक्तेदाराला ठेका देण्यासाठी भाजपाचा प्रयत्न ?आरोग्य अधिकाºयांचा बदलीबाबत शिवसेना व भाजपामध्ये राजकारण तापले असताना, आरोग्य अधिकाºयांची बदली आताच का ? हा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. मनपाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ७५ कोटी रुपयांचा शहराच्या सफाईसाठी काढण्यात आलेल्या एकमुस्त ठेक्यासाठी एकुण पाच निविदा प्राप्त झाल्या आहेत.या निविदांची छाननी प्रक्रिया गेल्या आठवडाभरापासून सुरु आहे. यामध्ये बिव्हीजी ही कंपनी निविदे प्रक्रियेत पात्र ठरली आहे. तर नाशिक येथील वॉटर ग्रेस हा कंपनी देखील स्पर्धेत आहेत. दरम्यान, नाशिकच्या कंपनीला हा ठेका दिला जावा यासाठी भाजपा पदाधिकाºयांचा आग्रह आहे. त्यासाठीच या कंपनीला नियमात बसविण्याचा प्रयत्न केला जात आहे.यासाठी निविदेच्या काही अटी व नियम शिथील करावे लागणार आहेत. मात्र, मनपा प्रशासन व आरोग्य विभाग हा बदल करण्यास इच्छूक नसल्याने आरोग्य अधिकाºयांचा बदलीचा प्रस्ताव भाजपाकडून आणण्यात आल्याची चर्चा आहे. अभियंता म्हणून उदय पाटील हे जरी आरोग्य अधिकारीपदी योग्य नसले तरी त्यांची एकमुस्त ठेक्याची निविदा अंतीम टप्प्यात आली असताना त्यांची बदला का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जळगाव मनपा महासभेने केलेल्या ठरावात बड्या पदाधिकाऱ्यांकडून बदलाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 11:21 AM
नाशिकच्या मक्तेदाराला ठेका देण्यावर भर
ठळक मुद्देआरोग्य अधिकाऱ्यांच्या बदलीवर राजकारण तापले :