ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 9 - आधी खरेदी नंतर कार्याेत्तर मंजुरी या सारखे गंभीर प्रकार 23 लाखाच्या जंतूनाशके खरेदीत आढळून आल्याने महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील यांना तडकाफडकी सेवामुक्तीचा निर्णय महापालिकेच्या महासभेत बुधवारी घेण्यात आला. या प्रकाराची चौकशी करून संबंधीतांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचेही यावेळी झालेल्या गरमागरम चर्चेत ठरले. महापालिकेची विशेष महासभा महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिण्यात आली होती. उपमहापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, नगरसचिव अनिल वानखेडे आदी प्रमुख उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या खरेदीवरून विषय तापलास्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शासन निर्देशानुसार 14 व्या वीत्त आयोगाच्या प्राप्त निधीतून आरोग्य विभागासाठी व्हॅक्युम एम्टीयर 4 नग, अत्याधुनिक व्हॅक्युम 1 व रॉडींग मशिन 1, साफ सफाई साहित्य, 1 ते 37 वॉर्डामधील 150 कचरा कंटेनर, फिरते शौचालय 2 नग, 6 ट्रॅक्टर ट्रालिसह व 1 रोबोटीक जे.सी.बी. मशिन खरेदी करण्याचा निर्णय सभेत चर्चेसाठी येताच सदस्य संतप्त झाले. नगसेवक नितीन लढ्ढा यांनी हा विषय मांडताना सांगितले की, आरोग्य विभागाने 23 लाख 70 हजार रुपये खर्च करून फेब्रुवारी महिन्यात खरेदी केलेले जंतू नाशके व दरुगधी नाशके पडून असून पाच महिन्यात केवळ 300 लीटर हे रसायन वापरले गेले. तब्बल 1700 लीटर रसायन धूळखात पडून असल्याची धक्कादायक माहिती मनपा स्थायी समितीच्या सभापती वर्षा खडके व नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी या ठिकाणी दिलेल्या भेटीत समोर आली होती. हा प्रकार अत्यंत गंभीर असून याप्रश्नी कडक कारवाई करणे आवश्यक आहे. मागची ट्रॅक्टर खरेदी 11 महिने कशी लांबलीयापूर्वी महापालिकेने ट्रॅक्टर खरेदीसाठी जी निविदा प्रक्रिया राबविली ती तब्बल 11 महिने लांबली. बाराव्या महिन्यात ट्रॅक्टर आले, हा प्रकार संशयास्पद होता,असेही बरडे म्हणाले. स्थायी समितीच्या सभापती वर्षा खडके, सभागृह नेता रमेशदादा जैन, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजपाचे पृथ्वीराज सोनवणे, रवींद्र पाटील यांच्यासह अन्य नगरसेवकांनी आरोग्य विभागातील गलथान काराभाराचा कडक शब्दात समाचार घेतला. ही रसायने नाशिकच्या मक्तेदाराकडून खरेदी केली गेली. त्यामुळे यामागे केवळ डॉ. विकास पाटील आहेत की अन्य कोणी, नाशिकचा ठेकेदार नेमका कुणाचा अधिकारी याचीही चौकशी व्हावी, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली. जंतूनाशके खरेदीसह शहरातील आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल तब्बल अर्धातास सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. आरोग्य विभागाने आरोग्य विभागाने 23 लाख 70 हजार रुपये खर्च करून खरेदी केलेल्या जंतूनाशके व दरुगधी नाशके खरेदी व्यवहाराची चौकशी केली जावी, तत्पर्वी आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील यांची मनपातील सेवा समाप्त केली जावी, चौकशीत ते व अन्य कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी भूमिका सभागृह नेते रमेशदादा जैन यांनी मांडली.कैलास सोनवणे यांनी या संदर्भात मांडलेल्या प्रस्तावाचा ठराव करावा असेही ते म्हणाले. डॉ. विकास पाटील यांची मनपातील सेवा समाप्त करून त्यांच्या जागी प्रभाग समिती क्रमांक 2 चे अधिकारी उदय पाटील याच्याकडे कार्यभार सोपविला जावा असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.