जळगाव : निवडणूक आयोग हा स्वायत्त असतानाही त्याप्रमाणे व्यवहार न करता भाजपाच्या हातचे बाहुले बनला आहे. निवडणुकांमध्ये शासकीय यंत्रणा, कर्मचारी, पोलीस ईव्हीएम हॅक करण्यासाठी मदत करीत आहेत. हे लोकशाहीला घातक आहे. जळगावातील मनपा निवडणुकीतही इव्हीएम व पैशांचा गैरवापर झाला आहे, असा आरोप राष्टÑवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्टÑीय अध्यक्षा फौजिया खान यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.मंगळवार, ७ रोजी दुपारी राष्टÑवादी कार्यालयासमोर ईव्हीएम मशिनची होळी करण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्षा आमदार विद्या चव्हाण, माजी महिला प्रदेशाध्यक्षा व माजी आमदार उषा दराडे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा व अमरावती जि.प.अध्यक्ष सुरेखा ठाकरे, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा विजया पाटील, जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील आदी उपस्थित होत्या.‘संविधान वाचवा देश वाचवा’ मोहीमेंतर्गत नाशिक येथे कार्यक्रम होत आहे. त्याच्या नियोजनाबाबत महिला आघाडीची बैठक मंगळवारी सकाळी राष्टÑवादी कार्यालयात झाली. त्यानंतर आकाशवाणी चौकात मनुस्मृतीच्या प्रतिकृतीचे तसेच इव्हीएम मशिनच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. जळगाव मनपा निवडणुकीत मनपा निवडणुकीत पैशांचा, ईव्हीएमचा गैरवापर झाल्याने बॅलेटचा वापर करावा, या मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली व ईव्हीएम प्रतिकृतीची होळी करण्यात आली. तर महिलांची सुरक्षा आधीच धोक्यात आली असताना संविधानात बदल करून मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न भाजपा सरकारकडून होत असल्याच्या निषेधार्थ व महिला सबलीकरण व्हावे या मागणीसाठी ‘मनुस्मृती’च्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले.
जळगाव मनपा निवडणुकीत ‘इव्हीएम’चा गैरवापर : फौजिया खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 5:36 PM
निवडणूक आयोग हा स्वायत्त असतानाही त्याप्रमाणे व्यवहार न करता भाजपाच्या हातचे बाहुले बनला आहे. निवडणुकांमध्ये शासकीय यंत्रणा, कर्मचारी, पोलीस ईव्हीएम हॅक करण्यासाठी मदत करीत आहेत. हे लोकशाहीला घातक आहे. जळगावातील मनपा निवडणुकीतही इव्हीएम व पैशांचा गैरवापर झाला आहे, असा आरोप राष्टÑवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्टÑीय अध्यक्षा फौजिया खान यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
ठळक मुद्दे‘इव्हीएम’व ‘मनुस्मृती’ची होळीशासकीय यंत्रणेची मदत लोकशाहीला घातकनिवडणूक आयोग भाजपाच्या हातचे बाहुले