शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Jalgaon: होत्याचे नव्हते झाले, पंधरा दिवसांपुर्वी पाहिलेल्या बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा, कृषी विभागाकडून पंचनामे सुरु

By ajay.patil | Published: March 14, 2023 6:26 PM

Jalgaon : खरीपाच्या कटू आठवणी विसरून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केली होती. अगदी पंधरादिवसांपर्यंत शेतातील डोलणारी पीकं पाहून बळीराजाने  खरीप हंगामाची कसर रब्बी हंगामात भरून निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

- अजय पाटील  जळगाव - खरीपाच्या कटू आठवणी विसरून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केली होती. अगदी पंधरादिवसांपर्यंत शेतातील डोलणारी पीकं पाहून बळीराजाने  खरीप हंगामाची कसर रब्बी हंगामात भरून निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर मंगळवारी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले असून, पंधरा दिवसांपुर्वी पाहिलेल्या स्वप्नांचा अक्षरश चुराळा झाला आहे.

मंगळवारी जिल्ह्यातील यावल, चोपडा, धरणगाव, जळगाव, अमळनेर या तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीच्या गहू, हरभरा, मका व ज्वारीचे प्रचंड नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. कृषी विभागाकडून अद्याप कोणताही आकडा समोर आला नसला तरी झालेल्या नुकसानीची आकडेवारी मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. कृषी विभागाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी यंदा उशीराने पेरणी केली होती, अशा शेतकऱ्यांचा माल अद्यापही शेतांमध्येच आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

संकट वाढणार, आगामी दोन गारपीटीचा अंदाजमंगळवारी जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये पाऊस झाला आहे. मात्र, सुदैवाने वारा नसल्यामुळे केळीचे नुकसान झाले नाही. दरम्यान, शेतकऱ्यांवरील संकट आणखीन दोन दिवस वाढणार आहे. कारण, भारतीय हवामान खात्याकडून आगामी दोन दिवस जिल्ह्यात  वादळी पावसासह आता गारपीटीचाही अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यात ज्वारी, दादर, बाजरी व मका मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढला जात असतो. त्यामुळे सध्यस्थितीत मका, दादर शेतातच आहे. एकीकडे दादरला चांगला भाव असताना गारपीटीचा अंदाज असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

मार्च महिना शेतकऱ्यांसाठी ठरतोय धोकेदायकगेल्या अनेक वर्षांपासून जागतिक हवामानात होत असलेल्या बदलामुळे जिल्ह्यातील वातावरणात देखील मोठा बदल होत आहे. गेल्या अनेक वर्षांचा अभ्यास पाहिला तर मार्च महिना हा शेतकऱ्यांसाठी धोकेदायक ठरत आहे. यंदा मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे ९ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड जर नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली तर अवकाळीमुळे होणारे नुकसान टाळता येवू शकते.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव