जळगाव : महिंला प्रसुती झाल्याचे कारण सांगून गुलशनबी शेख युसुफ उर्फ गुलीखाला (७५, ख्वॉजानगर, पिंप्राळा) या वृध्देस दोघांनी शनिवारी दुपारी दुचाकीवर बसवून नेत मारहाण केली, त्यानंतर गळ्यातील सोन्याची पोत व सात हजार रुपये हिसकावून पळ काढल्याची घटना पिंप्राळा परिसरात उघडकीस आली असून संशयितांनी तोंडावर कापड टाकल्याने चेहरा ओळखता आला नाही. दरम्यान, वृध्देस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलशनबी या मुलगा शेख सुपडू शेख युसुफ, रहीम शेख युसुफ तसेच शेख करीम शेख युसुफ नातवंडे, सुना यांच्यासह न्यू ख्वॉजानगर हुडको येथे कुटुबांसह वास्तव्यास आहेत. शनिवारी दुपारी प्रकृती बिघडल्याने त्या हुडकोतील मनपाच्या रूग्णालयात गेल्या होत्या. औषधोपचार केल्यानंतर घराकडे पायी जात असताना मागून दुचाकीवरून चेहरा झाकून आलेले दोन तरूण त्यांच्याजवळ थांबले. महिलेची प्रसुती झाली आहे, नाळ खंडणीसाठी सोबत चला, असा बहाणा करून त्यांनी वृध्देस दुचाकीवर बसवून सावखेडा रस्त्याकडे एका शेतात नेले. तेथे आधीच आणखी दोन जण चेहरा झाकलेले थांबलेले होते. त्यातील एकाने वृध्देच्या चेहऱ्यावर रूमाल टाकला. त्यानंतर त्यांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत व सात हजार रुपये असलेली पिशवी हिसकावली.परिसरातील टवाळखोरांवर संशयवृध्दा आरडाओरड करत असता सावखेडा गावाकडून दुचाकीवरून येत असलेले दोन जण त्याठिकाणी थांबताच संशयित पोत व रोकड घेऊन पसार झाले. दुचाकीवरील दोघांनी वृध्देस हुडकोजवळ सोडले. तेथून त्यांनी घरी गेल्यावर मुलांना हकीकत सांगितली. वृध्देस मारहाणीत दुखापत झाल्याने उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हुडकोतील शाळेजवळ काही टवाळखोर बसलेले असतात. ते येणाºया जाणाऱ्यांवर लक्ष ठेवतात. त्यांच्यातील कोणीतरी वृध्द आईला बहाणा करून लुटले,असा संशय मुलगा रहीम शेख युसुफ यांनी व्यक्त केला. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. े
जळगावात वृध्देस दुचाकीवर नेवून मारहाण करीत लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 12:04 PM