- विलास बारीजळगाव - गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठा केवळ ७ टक्के इतकाच वाढला आहे. जिल्ह्यातील जलसाठ्याची टक्केवारी ४१.२० असून गेल्यावर्षी ७०.८० टक्के इतकी होती. त्यामुळे यंदा धरणातील जलसाठा शंभरी गाठणार नाही, असेच चित्र आजतरी दिसून येत आहे.
दि.११ जुलै रोजी हतनूर धरणात ३२.८२, गिरणेत १९.२८ तर वाघूरमध्ये ५६.४१ टक्के जलसाठा होता. दि.१७ ऑगस्ट रोजी हतनूर ३२.३९, गिरणा ३७.३४, वाघूर धरणात ५६.३० टक्के जलसाठा होता. याची एकूण टक्केवारी ४०.७० टक्के इतकी आहे. गेल्यावर्षी ही टक्केवारी ७०.८३ इतकी होती. त्यामुळे धरणांमधील जलसाठ्याची आकडेवारी पाहून अनेकांना चिंतेत टाकणारा आहे.
७ प्रकल्प ‘पन्नाशी’वरदि.१७ ऑगस्ट रोजीच्या नोंदीनुसार सुकी, अभोरा व मंगरुळ धरणात १०० टक्के साठा आहे. गूळ आणि मोर धरणही साठ टक्क्यांवर भरले आहे. गिरणा, अंजनी धरणात ५० टक्क्यांवर साठा आहे. अग्नावती, हिवरा धरणात मात्र शून्य टक्के जलसाठा आहे. भोकरबारी २.२६, बोरी ४.९२, बहुळा ९.१० टक्के इतका जलसाठा आहे.