जळगाव : येथील दि जळगाव पीपल्स को- ऑप बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुक जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेला १ एप्रिलपासून सुरूवात करण्यात आली आहे. जळगाव पीपल्स को. ऑप बँक आणि सांगली जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाने गुरूवारी दुपारी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
ही निवडणूक एकुण १४ संचालकांच्या पदासाठी होणार आहे. त्यात जळगाव महापालिका हद्दीतील १२ मतदार संघ असतील. त्यात ९ सर्वसाधारण, अनुसुचित जाती- जमाती १ महिला राखीव २ अशा जागांचा समावेश आहे. तर महापालिका हद्दी बाहेरील पण जिल्ह्यातील १ व जिल्ह्या बाहेरील पण बँक कार्यक्षेत्रातील एका जागेचा समावेश आहे.
नामनिर्देशन पत्र मिळण्याची व प्रसिद्धीची तारीख - १ एप्रिल ते ५ एप्रिल, दुपारी २ पर्यंत निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालय, पीपल्स बँक, पोलन पेठ. अर्ज छाननीची वेळ - ६ एप्रिल, सकाळी ११ वाजता. अर्ज मागे घेण्याची तारीख - ७ एप्रिल ते १२ एप्रिल. उमेदवारांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी - १५ एप्रिल सकाळी ११ वाजता. सर्व साधारण सभा व मतदान - २४ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता, यशवंतराव पाटील मुक्तांगण सभागृह, मतमोजणीची वेळ - २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपासून एमआयडीसी.