सुनील पाटील जळगाव : डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या धोरणाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून जळगाव जिल्हा पोलीस दलाने जनतेशी निगडित ९ सेवा आॅनलाइन केल्या आहेत. सेवा हमी कायद्यांतर्गत नागरिकांसाठी या सेवा आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. या सेवांमुळे नागरिकांना पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता भासत नाही. तंत्रज्ञानात पोलीस दलानेही एक पाऊल पुढे टाकले आहे.आपत्कालीन, गुन्ह्यांच्या, तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगी पीडित नागरिक व महिलांना तत्काळ पोलिसांची मदत मिळावी, यासाठी प्रतिसाद अॅप सुरू करण्यात आले आहे. टोल फ्री क्रमांक, याशिवाय वाहनचोरीची तक्रार करण्यासाठी वाहन चोरी डॉट कॉम हे पोर्टल २७ मे २०१६ पासून सुरू करण्यात आले आहे. फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअॅप, सीसीटीव्ही मोबाइल व्हॅन, आॅनलाइन चरित्र पडताळणी आदी अॅप व यंत्रणा आॅनलाइन करण्यात आलेल्या आहेत.प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन टॅबतंत्रज्ञानात आणखी पुढचे पाऊल म्हणून पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दोन स्वतंत्र टॅब देण्याचा निर्णय घेतला. एक टॅब हा गुन्ह्यांच्या माहितीसाठी असणार आहे, तर दुसरा टॅब हा पासपोर्टसाठी असणार आहे. घटनास्थळावर फोटो काढणे, व्हिडीओ चित्रण करणे, पुरावे घेणे आदी कामे केली जाणार आहेत. या कामासाठी स्वतंत्र टॅब देणारा जळगाव हा महाराष्टÑातील पहिला जिल्हा आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी स्वत:हून त्यासाठी पुढाकार घेत हा विषय मार्गी लावला.सायबर प्रकल्पाची निर्मितीनवीन तंत्रज्ञान व उपकरणे वापरुन गुन्हे करण्याचे प्रमाण व त्याच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या साऱ्या घटनांना वेळेत नियंत्रण आणण्याकरिता गृह विभागाने सायबर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पांतर्गत जिल्हा स्तरावर सायबर लॅब, महाराष्टÑ सीईआरटी, सिक्युरिटी आॅपरेशन सेंटर व ट्रेनिंग सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्टÑात ४७ ठिकाणी सायबर लॅब होत्या, त्याचे रूपांतर सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे. महाराष्टÑात बहुतांश ठिकाणी पोलीस ठाण्यात रूपांतर झालेले नाही, जळगावात मात्र हे पोलीस ठाणे सुरू झाले.
जळगाव पोलीस दल झाले हायटेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 4:01 AM