शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

जळगावचा पोलीस कर्मचारी मालेगावात पॉझिटिव्ह, कर्मचाऱ्यांमध्ये भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 12:13 PM

वरिष्ठ दखल घेत नसल्याने नाराजी

जळगाव : कोरोना बंदोबस्तासाठी मालेगावात गेलेल्या यावल येथील एका पोलीस कर्मचाºयाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी रात्री या कर्मचाºयाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा कर्मचारी कानळदा, ता.जळगाव येथील रहिवाशी आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचेही स्वॅब घेण्यात आलेले आहेत.मालेगावात कोरोना बाधितांची संख्या अधिक असल्याने मृतांचाही आकडा मोठा आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने नाशिक परिक्षेत्रातून मालेगावात पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. जळगाव पोलीस दलातून ११० कर्मचारी बंदोबस्तासाठी गेले आहेत. त्यातील चार कर्मचाºयांचे चार दिवसापूर्वीच स्वॅब घेण्यात आले होते, त्याचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाला. त्यापैकी एका कर्मचाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याआधी देखील ८ कर्मचारी पॉझिटिव्ह आलेले असून ते वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. तसेच े एका पोलीस दाम्पत्य देखील पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु आहेत.पंधरा दिवसात कर्मचारी बदल करादरम्यान, जळगाव येथून बंदोबस्तासाठी मालेगावला पाठविलेल्या कर्मचाºयांना १५ दिवसासाठी पाठविण्यात आले होते, त्यांना अजूनही कार्यमुक्त केलेले नाही. पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस महासंचालक नियंत्रण कक्षाशी वारंवार संपर्क साधूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने या कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. येथील कर्मचाºयांना कार्यमुक्त करावे व नवीन दुसºया कर्मचाºयांना पाठवावे. पंधरा दिवसांनी कर्मचारी बदल करावे अशी मागणी कर्मचाºयांकडून केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव