शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

२ वर्षांचा परफॉर्मन्स... राज्यात शालेय शिक्षणात जळगाव सातव्या क्रमांकावर

By अमित महाबळ | Published: July 11, 2023 5:58 PM

शालेय शैक्षणिक व्यवस्थेची कामगिरीनिहाय वर्गवारी करणाऱ्या निर्देशांकाचा, २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षाचा एकत्रित अहवाल जारी करण्यात आला आहे.

अमित महाबळ

जळगाव : केंद्रीय शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने देशातील प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांचा गेल्या दोन वर्षांचा परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (पीजीआय-डी) जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचा लेखाजोखा मांडला आहे. २०२१-२२ मध्ये चार जिल्हे अतिउत्तम श्रेणीत, तर उत्तम श्रेणीतील ३२ जिल्ह्यांमध्ये जळगाव सातव्या क्रमांकावर आले आहे. आधीच्या तुलनेत जिल्ह्याला मिळालेल्या गुणांकनात सुधारणा झाली आहे.

शालेय शैक्षणिक व्यवस्थेची कामगिरीनिहाय वर्गवारी करणाऱ्या निर्देशांकाचा, २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षाचा एकत्रित अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालात जिल्हा स्तरावरील शालेय शिक्षण व्यवस्थेच्या सर्वंकष विश्लेषणासाठी निर्देशांक तयार करून या शिक्षण व्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. निर्देशांकानुसार मिळालेले गुणांकन हे जिल्ह्याने कुठल्या बाबतीत सुधारणा करणे आवश्यक आहे ते दर्शविते. या अहवालानुसार २०२०-२१ मध्ये उत्तम श्रेणीत १८ व्या क्रमांकावर असलेल्या जळगाव जिल्ह्याने २०२१-२२ या वर्षात गुणांकनात सुधारणा करीत सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

मूल्यांकनाची अशी होती विभागणीअहवालासाठी मूल्यांकन करताना ८३ निर्देशक ठरविण्यात आले होते. त्यांचे एकूण मूल्यमापन ६०० गुणांमध्ये केले आहे. या ८३ निर्देशकांची मिळालेले एकूण परिणाम, वर्गातून केल्या जाणाऱ्या अध्यापनाची परिणामकारकता, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचे हक्क, शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण, डिजिटल अध्ययन आणि प्रशासन प्रक्रिया या सहा गटांमध्ये विभागणी केली आहे.

शाळांमध्ये १६ कलमी कार्यक्रमामुळे भौतिक सुधारणा झाली, निपुणच्या चार चाचण्यांमुळे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तावाढीला चालना मिळाली. यापुढे अजून गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट आहे. आजचे यश हे सामूहिक असल्याचे जि. प. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांनी म्हटले आहे. 

२०२१-२२ मधील ग्रेडनिहाय क्रमश: स्थितीजिल्हे : ३६अति उत्तम : ०४ (सातारा, मुंबई २, कोल्हापूर, नाशिक)उत्तम : ३२ (सोलापूर, मुंबई उपनगर, संभाजीनगर, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, जळगाव, बीड, पुणे, अहमदनगर, ठाणे, नंदुरबार, रायगड, नांदेड, वाशिम, अमरावती, पालघर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गोंदिया, धुळे, परभणी, वर्धा, अकोला, भंडारा, जालना, लातूर, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, नागपूर, गडचिरोली.)

जळगावची स्थितीकोणत्या गटात : उत्तमकितवा क्रमांक : ०७

जळगाव जिल्ह्याचे गुणांकन२०१८-२०१९ : ३१४ २०१९- २०२० : ३७१ २०२० - २०२१ : ४०२ २०२१ - २०२२ :  ४०८

जळगाव जिल्ह्याची श्रेणी२०१८-२०१९ :   प्रचेष्ट १ २०१९- २०२० :  उत्तम २०२० - २०२१ : उत्तम २०२१ - २०२२ : उत्तम

टॅग्स :SchoolशाळाJalgaonजळगाव