भुसावळ : शहरातील जळगाव रोडवरील वाढीव, विस्तारित झालेल्या परिसरात कुठल्याही प्रकारची सोय नाही. तसेच हे शिवार ग्रामीण हद्दीत तर मतदान अधिकार शहरी हद्दीत आहे. परिणामी ‘ ना इधर के ना उधर के’ अशी परिस्थिती या भागातील नागरिकांची झाली आहे. या परिसरातील समस्या त्वरित सोडवाव्यात यासाठी काँग्रेसच्या फाउंडेशन शहराध्यक्ष मीनाक्षी जावरे यांनी पालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे व समस्या सोडण्याची मागणी केली आहे.शहरातील जळगाव रोडवरील एका खाजगी रुग्णालतासमोरील वरदविनायक कॉलनी, महालक्ष्मी नगर, स्वामी विहार, भाग्यश्री विहार, साईविहार, नारायणनगर याशिवाय अनेक नवीन कॉलन्या वसलेल्या आहेत. भौगोलिक दृष्ट्या हा सर्व्हे नंबर साकेगाव ग्रामीण हद्दीमध्ये येतो. मात्र येथील नागरिक मतदान हे शहरी हद्दीत करत असतात. यामुळे ‘ना इधर घे ना उधर ’ अशी परिस्थिती या प्रभागातील नागरिकांची झाली आहे. याठिकाणी ना धड रस्ते, ना पाणी, ना गटारीची साफसफाई होत असते.तसेच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग लागलेले आहेत. याशिवाय येथे पथदिवेही नेहमीच बंद असतात. याविषयी काँग्रेसच्या सेवा फाऊंडेशन शहराध्यक्ष मीनाक्षी जावरे यांच्यासह परिसरातील अनेक महिलांनी पालिका प्रशासनाला निवेदन देऊन या भागातील समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी केली आहे.
भुसावळातील जळगाव रोड, वाढीव परिसर समस्यांचे माहेरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 3:34 PM
शिवार ग्रामीण हद्दीत तर मतदान अधिकार शहरी हद्दीत असल्यामुळे ‘ना इधर के ना उधर के’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देकोणीही वाली नाही शिवार ग्रामीण हद्दीत तर मतदान अधिकार शहरी हद्दीत असल्यामुळे ‘ना इधर के ना उधर के’ अशी स्थिती