आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२३ : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शासकीय गोदामात १०० कोटींचा धान्य घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर पुरवठा विभागाच्या मुंबई व ग्राहक संरक्षण समितीच्या दोन पथकांकडून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रेशनच्या धान्य गोडावूनची तपासणी करण्यात आली. यावेळी पथकाने दप्तर ताब्यात घेत गोदाम सील करण्याची कारवाई केली.मुंबई येथील पुरवठा आयुक्त कार्यालय व ग्राहक संरक्षण समितीच्या दोन पथकांनी मंगळवारी दुपारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील धान्य गोदामाची तपासणी सुरु केली. या दरम्यान पथकाने गोदाम प्रमुखांकडून स्टॉक रजिष्टर तसेच आवक-जावक रजिष्टरच्या नोंदींची तपासणी केली. तर दुसºया पथकाने गोदामामध्ये येणारा धान्यसाठा तसेच वितरीत होणाºया मालाची माहिती तपासली. त्यानंतर दोन्ही पथकांनी दप्तर ताब्यात घेतले असून दप्तरातील नोंदी तसेच गोदामातील धान्य याची पडताळणी करण्यासाठी रात्री आठ वाजेच्या सुमारास गोदाम सिल करण्याची कारवाई केली.
मुंबई येथील पुरवठा आयुक्त कार्यालय व ग्राहक संरक्षण समिती अशा दोन पथकांनी मंगळवारी जळगावातील धान्य गोदामाची तपासणी केली. एका पथकाने धान्याचा साठा तर दुसºया पथकाने दप्तराची तपासणी केली. नोंदी व प्रत्यक्षसाठा याच्या पडताळणीसाठी पथकाने गोडावून सील केले आहे.अमोल निकम,तहसीलदार, जळगाव.